महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सैन्याच्या इगतपुरी तालुका अध्यक्ष पदी नागेश गायकर, यांची निवड.

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:-शिवनाथ घोटकर, इगतपुरी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाच्या दृष्टीने इगतपुरी तालुका आणि नाशिक जिल्हा अत्यंत महत्त्वाचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो.महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.रामदास जाधव. यांच्या मार्गदर्शनाखाली मा. श्री.नागेश गायकर, यांची महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या इगतपुरी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नागेश गायकर यांना हे नियुक्तीपत्र महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.रामदास जाधव. यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले,

दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख मा.श्री.राजसाहेब ठाकरे, यांच्या आदेशाने नागेश गायकर, प्रामुख्याने इगतपुरी तालुक्यातील स्थानिक शेती, पर्यटन आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारे शेतकरी नेते आणि पक्षाचे एकनिष्ठा कार्यकर्ते आहे, तसेच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न शासनापुढे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, त्यांच्या कार्याची दखल घेतयांना मनसेच्या शेतकरी तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली.

अध्यक्ष निवड होताच नागेश गायकर, यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे सांगितले. नागेश गायकर यांची निवड झाल्याबद्दल मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.रामभाऊ जाधव, प्रदेशचे रतनकुमार इचम, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर भोर, शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर भोर, जिल्हा उपसंघटक भागीरथ मराडे, मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष आत्माराम मते, यांच्यासह इगतपुरी मनसे पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *