प्रत्येक गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे.प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे यांचे मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे निवेदन,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे,अहिल्यानगर, संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर व्हावा. यासाठी प्रत्येक गावात महामानव; भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात यावे.अशी मागणी आंबेडकर विचारांनी प्रभावित असलेले प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे निवेदन पाठवून केली आहे.या निवेदनात त्यांनी नमूद केले की; डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य ;समता व बंधू भावाचा संदेश दिला. त्यांच्या विचारामुळे लाखो वंचितांना शिक्षण व स्वाभिमानाची दिशा मिळाली. त्यामुळे गावागावात भिमरायांचे स्मारक उभारल्यास नव्या पिढीसमोर प्रेरणेचे केंद्र निर्माण होईल.तसेच स्मारक परिसरात वाचनालय अभ्यासिका व संविधान जनजागृती केंद्र सुरू करण्यात यावेत. अशी मागणी निवेदनातून प्राध्यापक ज्ञानेश्वर बनसोडे यांनी केली आहे.भीमरायांचे स्मारक म्हणजे दगडांची वास्तू नसून सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा आहे. अशी मनापासून ची तळमळ श्री बनसोडे सर यांनी व्यक्त केली आहे. बनसोडे सरांच्या या मागणीमुळे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून.शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *