रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)इगतपुरी, व जनसेवा जनाधार सेवा मंडळ कालकथित पुंडलिक(अप्पा)शंकर निरभवणे यांच्या स्मरणार्थ, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यावाटप,

बातमी शेअर करा.

इगतपुरी: प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर,
दि,१२/०७/२०२६,रोजी.इगतपुरी येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आणि जनसेवा जनाधार सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे माजी कार्यकारी अभियंता अरुणजी निरभवने लाभले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुनील रोकडे, इगतपुरीच्या नगरसेविका सौ. वंदना सुनील रोकडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दातरंगे, गायकवाड, डोळस, सुनील पगारे, शाहीरराज चंद्रमोरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष गोविंद शिंदे, पत्रकार सुनील शिंदे, पोपट दोंदे आणि बाळासाहेब दोंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन हुकूमचंद पाटील सर यांनी केले.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात मदत व्हावी आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, या दुहेरी उद्देशाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अंधश्रद्धेचे समूळ उच्चाटन करण्याचे आवाहन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा कार्यकर्ते प्रतीक रोकडे, अमित रोकडे, हर्षद लांडगे, यश रोकडे, प्रथमेश बागुल, विकी तेलोरे, जयेश बागुल, आयुष रोकडे, राम यादव, रतन चंद्रमोरे आणि अमोल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल परिसरातून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *