‘वारी संविधानाची, आली आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ऐतिहासिक राज्यस्तरीय १४३२ वी शासकीय संविधान प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न!

बातमी शेअर करा.

इगतपुरी प्रतिनिधी : शिवनाथ घोटकर, दि.३०/१०/२०२६ रोजी,भारतीय संविधानातील लोकशाही मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्त्वांची जनमानसात रुजवणूक व्हावी, तसेच समाजातील प्रत्येक घटकाला संविधानाची ओळख आणि त्यातील अधिकार व कर्तव्यांची जाणीव व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या संविधान जनजागृती अभियानांतर्गत ‘वारी संविधानाची, आली आपल्या दारी’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.इगतपुरी पंचायत समितीच्या वतीने शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी घोटी बुद्रुक, येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर २, येथे राज्यस्तरीय १४३२ वी शासकीय संविधान प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या कार्यशाळेत संविधान अभ्यासक आणि व्याख्याते तुषार बा. पगारे, तसेच सिद्धार्थ मेहेरखांब यांनी उपस्थितांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे शाल व गुलाबपुष्प देऊन स्वागत आणि सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे प्रभावी सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिवाजी बी. थेटे सर यांनी केले.तुषार पगारे यांचे संविधानावर प्रभावी विवेचनकार्यशाळेचे मुख्य व्याख्याते म्हणून नाशिक येथील ‘समय सूचक बहुउद्देशीय संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष श्री. तुषार बा. पगारे उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस प्रबोधनी (MPA), शासकीय शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शेकडो व्याख्याने देण्याचा अनुभव असलेल्या पगारे यांनी संविधानातील विविध तरतुदी, मूलभूत अधिकार, नागरिकांची कर्तव्ये आणि लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व अत्यंत सोप्या, ओघवत्या व अभ्यासपूर्ण भाषेत स्पष्ट केले.”भारतीय संविधान कोणत्याही जाती-धर्माचा अनादर करायला शिकवत नाही, तर प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार, समानता आणि बंधुभावाची शिकवण देते,” असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला.

संविधान हे केवळ पुस्तक नसून देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनाला दिशा देणारे आणि लोकशाहीला बळकटी देणारे सर्वोच्च मार्गदर्शक तत्त्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.सिद्धार्थ मेहेरखांब यांचेही मोलाचे मार्गदर्शनदुसरे प्रमुख व्याख्याते श्री. सिद्धार्थ मेहेरखांब यांनी लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांची भूमिका, संविधानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, सामाजिक सलोखा आणि घटनात्मक मूल्यांचे पालन याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संविधानाची खरी ताकद ही नागरिकांच्या जागरूकतेत असून प्रत्येकाने आपल्या अधिकारांसोबत कर्तव्यांचीही जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.मान्यवरांची विशेष उपस्थितीया कार्यशाळेला शासकीय अधिकारी श्री. महेश वळवी साहेब आणि गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब मुंडे साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली. इगतपुरी तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संविधान जनजागृतीचा प्रभावी उपक्रम‘वारी संविधानाची, आली आपल्या दारी’ हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून संविधानातील विचार, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक समतेचा संदेश गावागावांत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे. अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि सामान्य नागरिकांमध्ये घटनात्मक साक्षरता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.इगतपुरी तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय संविधान प्रशिक्षण कार्यशाळेमुळे घोटी बुद्रुकच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात संविधान जनजागृतीचा एक महत्त्वपूर्ण संदेश पोहोचला असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *