
प्रतिनिधी : शिवनाथ घोटकर, मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित घोटी येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आदरपूर्वक साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य कैलास आहेर होते.
व्यासपीठावर चारुशीला तागडे, हेमंत झोले, निवृत्ती सरगर, कैलास पाचोरे, अर्पणा उईके, अविनाश निकम, संपत शेंगाळ, गायत्री सूर्यवंशी, प्रकाश तांबे, सत्येन जाधव, मंगेश कासार, प्रा. स्वाती जगताप, मुख्य लिपिक रावसाहेब रणशेवरे, वरिष्ठ लिपिक जीवन शिंदे, अनिल गोवर्धने आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल व स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सोमनाथ गिरी व उज्वला देवरे यांनी सरदार वल्लभभाई पटेल, आणि इंदिरा गांधी, यांच्या जीवनकार्याची ओळख करून देत त्यांच्या देशासाठीच्या योगदानाची माहिती उपस्थितांना दिली.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य कैलास आहेर म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे ‘पोलादी पुरुष’ म्हणून ओळखले जाते.
देशातील संस्थानांचे विलीनीकरण करून भारताची एकात्मता मजबूत करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून देशाच्या विकासासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या दोन्ही महान विभूतींचे कार्य देशासाठी सदैव प्रेरणादायी राहील, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ गिरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश देवगिरे यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
