
प्रतिनिधी:पांडुरंग दोंदे.त्र्यंबकेश्वर, दि.०७/०१/२०२५, ईगतपुरी तालुक्यातील घोटी.बु.येथील हुरहुन्नरी प्रसिद्ध कलावंत गणेश बोराडे यांस मुंबई येथील आंतरराष्टीय चित्रपट महोत्सव २०२५ चा दिन दिन दिवाळी या मराठी लघुपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहिर झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जाहिर झालेल्या या पुरस्काराने नाशिक जिल्हा व ईगतपुरी तालुक्याची शान व मान अभिमानाने उंचावली आहे. या अभिनेत्यावर सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध मराठी मालिका, चित्रपट, लघुपट आदींमध्ये मराठीतील दिग्गज कलाकारांसमवेत घोटी येथील गणेश बोराडे या हुरहुन्नरी कलाकाराने आपल्या अभिनय प्रतिभेने अप्रतिम रंग भरले असुन अभिनय क्षेत्रात दिमाखदार कामगिरी करत आहे. मुंबई येथे पंचशील कला, क्रिडा व शिक्षण प्रसारक मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्रीदत्त माने यांनी चित्रपट क्षेत्रातील निर्मिती, दिग्दर्शन,अभिनय आदींसह विविध तांत्रीक बाबींसाठी पुरस्कार जाहिर केले आहे. ही संस्था मराठी भाषेत दर्जेदार निर्मिती, कलावंतांना प्रोत्साहन, प्रशिक्षण,भरीव आर्थिक मदत आदी विविध पातळीवर भुषणावह काम करत आहे. अभिनेता गणेश बोराडेच्या या यशाचे नाशिक जिल्हयात सर्वत्र कौतुक होते आहे.
प्रतिक्रिया: लांबचा पल्ला गाठायचा आहे, अभिनयाच्या विविध अंगाचा बारकाईने अभ्यास व आत्मसात करुन भविष्यात आधिकादुर पल्ला गाठायचा आहे.- अभिनेता गणेश बोराडे,
