
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून अनेक महिलांना आजपासूनच 1500 रुपये जमा झाले आहेत. मकरसंक्रांतीपूर्वी रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले होते आणि त्यानुसार आता प्रत्यक्षात पैसे खात्यावर येऊ लागले आहेत. त्यामुळे अनेक महिलांनी थोडा दिलासा व्यक्त केला आहे.
