
प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर, दि.१४/०१/२०२६, इगतपुरी तालुका प्रहार संघटना तालुका अध्यक्ष नितीन गव्हाणे पाटील यांचा वाढदिवस दिव्यांग बंधू भगिनींच्या उपस्थिती केक कापून एकमेकांना पेढा भरून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन करण्यात आला, यावेळी प्रत्येक जण नितीन गव्हाणे यांच्या कामाबद्दल कौतुक केले.दिव्यांगाच्या मासिक(महिना)अनुदान मिळावे तसेच प्रत्येक ग्रामपंचायत मधून ५% अनुदान मिळता की नाही फोन करून ग्रामअधिकार विचारतात, तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद ५% निधी व योजना दिव्यांग पर्यंत मिळण्याच्या प्रयत्न करतात तसेच दिव्यांग साठी शासकीय योजना कार्यक्रम राबवतात. असे उदगार दिव्यांग बंधू भगिनींच्या वतीने काढण्यात आले, व आनंद उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.
