इगतपुरी तालुक्यात श्रमजीवी महिला सामाजिक संस्थेची(माया फाउंडेशन) आढावा बैठक. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर,

बातमी शेअर करा.

(प्रतिनिधी): शिवनाथ घोटकर,घोटी बु, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी खंबाळे घोटी बु. येथील शासकीय विश्रामगृहात श्रमजीवी महिला सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य,(माया फाऊंडेशन)ची आढावा बैठक उत्साहात पार पडली.संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष माया मुक्ताई, अध्यक्ष सुनिल डी. पगारे, आणि त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष काळू भाऊ गांगुर्डे, यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हाध्यक्ष शाहीर नानासाहेब सोनकांबळे, हे होते. या बैठकीत सामाजिक कार्याचा विस्तार करण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या नूतन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

नूतन नियुक्त पदाधिकारी, नाशिक जिल्हा उपअध्यक्ष मा. श्री. गणेशजी घारे, इगतपुरी तालुका दिव्यांग अध्यक्ष मा. श्री. राजूभाऊ भंडारी, इगतपुरी तालुका दिव्यांग महा सचिव मा. श्री. जयेशजी शाहा.(व्यापारी), इगतपुरी तालुका संघटक मा. श्री. संदीपभाऊ शिंदे, इगतपुरी तालुका कार्याध्यक्ष, मा. श्री. हरिश्चंद्र दादा शेलार, घोटी बु. महिला बचत गट अध्यक्ष श्रीमती कांताबाई जाधव, इगतपुरी तालुका सदस्य मा. श्री. दिपका भाऊ माळी, बैठकीच्या शेवटी श्रमजीवी महिला सामाजिक संस्था म राज्य,(माया फाउंडेशन) सचिव शिवनाथ घोटकर यांनी उपस्थितांचे आभार मानून बैठकीची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *