प्रौढ महिला विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जन्मशताब्दीनिमित्त निबंध स्पर्धा संपन्न; विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग,

बातमी शेअर करा.

संभाजीनगर:(विशेष प्रतिनिधी)संपादक: माया मुक्ताई, प्रौढ महिला विद्यालय, संभाजीनगर येथे नुकतीच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शाळेतील विविध वर्गांतील विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत आपल्या प्रभावी लेखणीतून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा व कार्याचा विस्तृत परिचय करून दिला.स्पर्धेत नववी, सातवी आणि चौथी इयत्तेतील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. विजेत्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी बक्षीस स्वीकारताना विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद, उत्साह आणि आत्मविश्वास या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.कार्यक्रमाची सुरुवात काटकर मॅडम यांनी केलेल्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिकांनी विद्यार्थिनींशी संवादात्मक मार्गदर्शन करत शाळेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यार्थिनींच्या उपजत कलागुणांना आणि लेखन कौशल्याला प्रोत्साहन देणे काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या लेखन कौशल्याचे भरभरून कौतुक केले. तसेच त्यांच्या यशाचे अभिनंदन करून भविष्यातही अशा स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रंधवे मॅडम, काटकर मॅडम, सिंगर मॅडम, मोरे मॅडम, महादेव डांबरे सर आणि डांबरे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *