केदारनाथ ग्रुपतर्फे घाटनदेवी माता मंदिरात भाविकांना दूधप्रसादाचे वाटप,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:- शिवनाथ घोटकर इगतपुरी, नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वानिमित्त इगतपुरी तालुक्यातील भाविक भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या घाटनदेवी माता मंदिरात केदारनाथ ग्रुपच्या वतीने सामाजिक व धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पहाटे देवीची आरती झाल्यानंतर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना दूधप्रसादाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात सेवाभावाची भावना अनुभवायला मिळाली. यावेळी केदारनाथ ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.केदारनाथ ग्रुपच्या वतीने यापूर्वीही विविध धार्मिक आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे भाविकांना दूध, केळी व खिचडीचे वाटप करण्यात आले होते. धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत भाविकांची सेवा करण्याचा प्रयत्न ग्रुपच्या सदस्यांकडून सातत्याने केला जात आहे.‘सेवा हीच खरी भक्ती’ हा भाव मनात ठेवून केदारनाथ ग्रुपचे कार्यधार्मिक उत्सव केवळ साजरे न करता त्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देण्याचा केदारनाथ ग्रुपचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. धार्मिक परंपरा जपत गरजू आणि भाविकांना मदतीचा हात देणे, अन्नदान व प्रसादवाटप यांसारख्या उपक्रमांतून सामाजिक एकोपा वाढविणे, हे कार्य ग्रुपच्या माध्यमातून केले जात आहे.केदारनाथ ग्रुपच्या सदस्यांनी भविष्यातही अशाच प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *