
प्रतिनिधी :शिवनाथ घोटकर घोटी, दि. १४/११/२०२५, शेतकरी व शेतकरी कृती समितीचा पूर्ण विरोध आहे. घोटी खंबाळे ते पेगलवाडी त्र्यंबकेश्वर पर्यंतच्या सर्व ग्रामपंचायती ह्या पैसा क्षेत्रात येत असून या भूसंपादनाचा शेतकर्याना कधीही न भरून निगनारे मोठ्या प्रमाणात शेती चे नुकसान होत आहे, तरीही शासनाने याकडे लक्ष द्यावे.आमचा भाग डोंगराळ भाग असून शासनाच्या परिपत्रका नुसार रस्त्याच्या हद्दी पासून ५ मीटर बांधकामाची परवानगी ग्रामपंचायत मार्फत मिळावी व तसेच जे पक्के बांधकाम, घरे, व्यावसाईक, दुकाने यांच्या बांधकामाची परवानगी हि स्थानिक ग्रामपंचायत मार्फत असावी.आहुर्ली ते म्हसुर्ती जो सध्या स्थितीत रस्ता आहे, त्याचे या पूर्वी भूसंपादन झाले नसून तसेच सदर रस्ता हा गाव्नाकाषा वर पण रस्त्याची कुठल्याही प्रकारे नौद नाही त्याचा कुठल्याही प्रकारचा या आदि मोबदला घेतलेला नाही. वाढणाऱ्या रस्त्याबद्दल काही गावच्या मोठ्या प्रमाणात जागा जात आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात भूमिहीन होत आहेत, या साठी सर्व शेतकऱ्यांचा भूसंपादना साठी पूर्ण विरोध आहेआपण या पूर्वी संपादित केलेल्या जमिनीमध्ये रस्ता करण्याचा प्रयत्न केल्यास रस्ता होऊ शकतो मात्र शासन बळजबरीने शेतकऱ्यांवर अन्याय करून जास्त जागा भूसंपादन करत आहे.पुढच्या वीस वर्षाचे नियोजन करून शासन करत असेल तर हा शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय आहे, यापूर्वी तालुक्यात एम.आय.डी.सी, धरणे,समृद्धी महामार्ग, रेल्वे, मुंबई नाशिक एक्सप्रेस, फिल्म सिटी , अशा अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेले आहेत ,रस्त्याचे इतक्या मोठ्या प्रमाणात संपादन होणे म्हणजे शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय होणार आहे. रस्त्याच्या संपादनात खंबाळे वाडी, ते म्हसुली या गावांमधील शेतकऱ्यांची जमीन, घरे, दुकाने, गोठे, पोल्ट्री शेड विहिरी व इतर संसाधने खूप मोठ्या प्रमाणात संपादित होत आहे, त्या पैकी काही शेतकर्यांना घर व भूसंपादन झाल्या नंतर घर बांधन्यासाठी जमीन सुधा राहत नाही, असे असतानी शासनाने शेतकऱ्यांवर कोणत्या न कोणत्या प्रकल्पा मार्फत भूसंपादन लादत आहे. त्या मुळे शेतकरी भूमिहीन होत आहे. या गोष्टीकडे शासनाने गांभीर्याने लक्षवेधन असे भू संपादन करू नाही, आजचे शेतकरी कृती समितीच्या वतीने आंदोलनात मुद्दे मांडण्यात आले, आले या वेळी उपस्थित, शेतकरी कृती समिती अध्यक्ष नागेश गायकर, सचिव गोरख वाजे, उपाध्यक्ष सपन परदेशीं, विवेक कुटके, सह सचिव AVD. भारत कोकणे, खजिनदार भास्कर पाचरणे, व सल्लागार समिती चे अरुण भाऊ पोरजे, उमेश खातळे,, AVD. हनुमंत मराडे, संपत वाजे, उपसभापती मार्केट कमेटी घोटी क्षीरसागर साहेब, किशन गायकर, श्याम गायकर सरपंच रामदास जमदाडे सरपंच,कुंडलिक जमदाडे द्यानेश्वर जमदाडे, सुरेश जमदाडे, नंदू जमदाडे, नथू पाटील कुटके, शरद खकाळे, दत्तू पा. खकाळे, इत्यादी शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते,
