
प्रतिनिधी:पांडुरंग दोंदे, त्र्यंबकेश्वर. दि.२२/११/२०२५, आगामी येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकी संदर्भात त्र्यंबकेश्वर तालुका वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक त्र्यंबकेश्वर येथील हॉटेल ताज येथे पार पडली.या बैठकीत पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यात प्रत्येक गावात गाव तेथे शाखा उघडणे,पक्ष संघटन मजबूत करणे, तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर सर्व जागा लढणार या विषयांवर चर्चा करण्यात आली.तसेच अंजनेरी गणासाठी सर्व साधारण मधून किरण मोंढे, हे इच्छुक उमेदवार आहेत.किरण मोंढे यांच्यासह तालुक्यातील आदिवासी तरुणांनी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला, असून तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढत आहे. यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष अरुण काशीद,तालुका महासचिव रमेश गांगुर्डे,जिल्हा उपाध्यक्ष मधुकर कडलग, ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश काशीद,साहेबराव पालवे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष रमेश जाधव,वंचितचे त्र्यंबकेश्वर.शहराध्यक्ष मोहन सोनवणे,अशोक देहाडे,काशिनाथ गांगुर्डे,कैलास ससाणे,सुरज पवार, सुमित काकडे,रोहित खरात,पवन गांगुर्डे,काळू गांगुर्डे, वेदांत ,पंढरी मोंढे, गोविंद जाधव,अभि गांगुर्डे यांसह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
