माणिकखांब,मुंढेगाव ग्रामस्थांच्या वतीने इगतपुरी वनविभागास निवेदन.

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर,घोटी. दि.१३/०१/२०२६. इगतपुरी तालुक्यात अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्यात डोंगर जवळ असलेल गाव माणिकखांब,बळवंतवाडी, परीसरात बरेच दिवसापासून बिबट्या निदर्शनास येत आहे. मुंढेगाव ते बळवंतवाडी रस्ता वळणदार आहे.अनेक शेतकरी शेती च्या कामासाठी शेतात घरे करून रहातात त्याचे पाळीव प्राणी गाय, म्हैस, बैल,बकर्या,इ. बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. पहाटे लवकर आणि रात्री उशीरापर्यंत अंधारात रस्ते ने कामगार आणि दूध घेऊन शेतकरी घोटी,मुंढेगाव, या रस्त्याने जातात. तसेच काही लोक पायी तसेच दोन चाकी वाहनाने ये जा करतात.अशाच माणिकखांब बळवंतवाडी शिवारातील शेतकरी म्हशीचा गोठा करून रहात असून शेती आणि इतर कामातून उदरनिर्वाह चालतो मागील अनेक दिवसांपासून बिबट्या वावरत असून त्याने कुत्रे, मांजर, पळवले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा जीवितास धोका असुन कोणतीही जीवित हानी होऊ शकते. बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, असून आपल्या कार्यालयामार्फत लवकरात लवकर पिंजरा अथवा इतर उपाययोजना करून ग्रामस्थांच रक्षण करा असं निवेदन माणिकखांब गावचे माजी सरपंच हरिचंद्र मारुती चव्हाण, यांच्यामार्फत वनविभाग अधिकाऱ्यास देण्यात आले यावेळी उपस्थित. विनायक चंद्रकांत गतीर, ऋषिकेश रामलाल गतिर, रामेश्वर कौदरे, सखाराम आनंदा चव्हाण, इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *