घटनास्थळी छायाचित्र

प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर, दि.०६/०१/२०२६.रोजी, राहुरी–शनिशिंगणापूर रस्त्यावर उंबरे गावानजीक तांबे पेट्रोल पंपासमोर सायंकाळी भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि तीनचाकी रिक्षा यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत रिक्षातील चार प्रवासी जागीच ठार झाले, तर पाचहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. रिक्षा ही इगतपुरी गिरणारे येथील असून हे तरुण शिर्डी शनी शिंगणापूर, दर्शनासाठी गेले असता हा अपघात झाला. १)दीपक जगन डावखर, वय २२,वर्ष रा.गिरणारे ता.इगतपुरी, (मयत) २) आकाश मनोहर डावखर, वय २२ वर्ष, रा.गिरणारे.ता.इगतपुरी (मयत) ३) दीपक विजय जाधव, वय २२ वर्षे, रा.गिरणारे.ता.इगतपुरी(मयत) आणि १)रूपेश गणेश भगत , वय १९ वर्ष,गिरणारे.ता.इगतपुरी, (जखमी) २)रोशन गंगाधर डावकर, वय२४ वर्ष, रा.गिरणारे.ता.इगतपुरी (जखमी) अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला असून ट्रॅव्हल्स पलटी झाली आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिस व ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून राहुरी पोलीस पुढील तपास करत आहेत.
