
राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी इगतपुरी तालुक्याच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देतांना राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्री पांडुरंग वारुंगसे, इगतपुरी : तालुक्यात दोन दिवसांपूर्वीझालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या भातपिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांवर कुठल्याही अटी-शर्ती न लादता सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीमागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्री गोरख बोडके, व तालुकाध्यक्ष श्री पांडुरंग वारुंगसे, यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मा.श्री अभिजीत बारावकर, यांना याबाबत निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन-चार दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर कोसळत असून, या जोरदार अतिवृष्टीमुळे इगतपुरी तालुक्यातीलशेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भातपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मा.जि.प.सदस्य श्री जर्नादन माळी, मा. तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, श्री गोरखभाऊ बोडके, श्री सुनिलभाऊ वाजे, श्री पांडुमामा शिंदे,श्री रमेश पाटील पाटेकर, श्री अरुण गायकर,श्री नारायण वळकंदे, श्री मदन कडू, श्री ज्ञानेश्वर कडू ,श्री सखाराम गव्हाणे ,श्री अनिल वाजे, श्री तुकाराम सहाने, राहुल सहाने, तुकाराम वारगडे, श्री रतन बांबळे, श्री वसंत भोसले, श्री गौतम भोसले, श्री राम शिदे, रामदास जमदडे, श्री पांडुरंग खातळे, रमेश देवगिरे, श्री पांडुरंग कोकणे, श्री नामदेव शिंदे, तसेच सर्व पदाधिकारी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते…..
दैनिक प्रतिनिधी श्री शिवनाथ घोटकर,
