
प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर, इगतपुरी,
दि.20/11/2025, मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. 16 नोव्हेंबर2025, रोजी गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनर याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी आरोपी याला ताब्यात घेतले. या भयानक घटनेमुळे परिसरात भीती आणि प्रचंड तनावाचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत. दरम्यान, पीडित मुलीचा मृतदेह जेव्हा तिच्या राहत्या घरी आणला. त्यावेळी एकच आक्रोश झाला. भयानक कृत्य घटना घडली यज्ञा बाळाला न्याय मिळाला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात घ्यावे नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातून चिमुकलीला न्याय देण्यासाठी शिव शाहू फुले आंबेडकर सेना यांचे महाराष्ट्र राज्यातुन आंदोलन करण्यात येईल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी, जिल्हाधिकारी नाशिक मा.आयुष प्रसाद, तसेच अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर, यांना नाशिक मालेगाव मध्ये झालेल्या चिमुकलीच्या प्रकरणाबाबत आरोपीवर कठोर कारवाई करावी, या बाबत निवेदन दिले. शिव शाहू फुले आंबेडकर, सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुयोग बागुल, व अमरावती महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई पांडे, व अध्यक्ष पश्चिम नाशिक यशजी मौले,शहराध्यक्ष अक्षय जगताप, जिल्हाध्यक्ष सुहास सराफ,शेकडो पदाधिकाऱ्यांनी निवेदन देण्यासाठी उपस्थिती होते.
