
प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर, इगतपुरी
दि.14/11/2025रोजी जि.प. प्रा शाळा कानडवाडी ता. इगतपुरी जि. नाशिक, येथे बालदिन साजरा करण्यात आलासर्व विद्यार्थ्याना प्रथम पुष्प देऊन सत्कार करण्यात आला . इगतपुरी पंचायत समितीय मा. सभापती श्री. सोमनाथ भाऊ जोशी, यांनी सर्व विद्यार्थाना गोड खावू वाटप केला.मुलांचे हक्क, शिक्षण आणि कल्याण याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतात बालदिन साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो, ज्यांना लहान मुलांची आवड होती.मुख्याध्यापक श्री. भामरे सरांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. श्रीमती. शिरसागर मॅडम, यांनी सर्वाचे आभार मानले.शा.व्य.स. सदस्य श्री. दशरथ धोंगडे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सौ.रुपाली गवारी, व पालकतसेच वैदकिय अधिकारी श्रीमती गांगुर्डे मॅडम, डॉ.पगारेहे उपस्थित होते..
