
प्रतिनिधी: पांडुरंग दोंदे.त्र्यंबकेश्वर,
दि.१०/१२/२०२५भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाणदिनी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक त्र्यंबकेश्वर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व बुद्धवंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमात अरुण काशीद,रमेश जाधव,अरुण शिंदे मोहन सोनवणे,सोनम गांगुर्डे,यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य सांगितले.रमेश गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले तर मधुकर कडलग यांनी आभार मानले. कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी यांसह हरी सोनवणे,चंदर कांबळे, संजय कांबळे,भागवत गांगुर्डे,योगेश रोकडे,अंबादास पालवे,नामदेव गांगुर्डे, हरिभाऊ अंबापुरे,एकनाथ मोंढे,भीमराव गांगुर्डे,कारभारी पालवे,सिद्धार्थ गांगुर्डे,लक्ष्मण लोहकरे, सोनम गांगुर्डे,प्राची मोंढे, सारिका जाधव,शिल्पा मोंढे,विमल काशीद, ताई मगर,मोनाली मोंढे, व बौद्ध उपासक,उपासिका उपस्थित होते.
