
प्रतिनिधी:शिवनात घोटकर घोटी, पिंपरी सद्रोदिन ग्रामपंचायतच्या वतीने 3 डिसेंबर 2025 जागतिक दिव्यांग दिवस साजरा, करण्यात आला कार्यक्रमाच्या उद्देशाने सामान्य जनतेमध्ये दिव्यंग व्यक्तींबद्दल जनजागृती व्हावी म्हणून पिंपरी सद्रोदिन ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला उपस्थित यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे पोलीस पाटील रमेश पाटेकर यांनी दिव्यांगांना व त्यांच्या पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले, प्रमुख पाहुणे प्रहार संघटना तालुका अध्यक्ष मा. नितीन गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते इरफान पठाण, संतोष मानकर यांनी दिव्यांग व्यक्ती साठी असणाऱ्या शासकीय योजना, दिव्यांग कायदा, संजय गांधी पेन्शन योजना, घरकुल, दिव्यांग प्रमाणपत्र अशा विविध योजनेची माहिती दिली, ग्रामसेवक निलेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर कदम, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक शेवाळे सर यांच्या हस्ते दिव्यांगांना ५% ग्रामपंचायत निधी वितरित करण्यात आला, यावेळी कार्यक्रमासाठी आसिफ शेख, इरफान शेख, शफिक पठाण, पंढरी कडू, विलास कानकट, उमेश खारके, अमन पठाण व सर्व ग्रामस्थ मंडळी व दिव्यांग बांधव कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
