
प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर घोटी, दि.०४/१२/२०२५ वाकी, ता.इगतपुरी, जि. नाशिक, “जागतिक दिव्यांग दिन हा फक्त औपचारिक साजरा करण्याचा दिवस नसून, आपल्या दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी अधिक संवेदनशील व सक्षम व्यवस्था उभी करण्याची आठवण आहे. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीमध्ये असलेल्या कौशल्यांना योग्य संधी मिळाली तर ते समाजासाठी प्रेरणादायी कार्य करू शकतात. ग्रामपंचायत म्हणून आम्ही त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी तत्पर आहोत. शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि शासकीय योजनांचे लाभ दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही निष्ठेने पार पाडत राहू.”त्यांनी पुढे सांगितले की,“आज स्थापन झालेला ‘ज्ञानदीप’ गट त्यांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या गटामार्फत दिव्यांग बांधवांच्या समस्या ग्रामपंचायत स्तरावर त्वरेने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.असा विश्वास ग्रामपंचायत अधिकारी डॉ. ज्योती केदारे यांनी दिला.या वेळी उपस्थित दिव्यांग बांधवांनी डॉ. ज्योतीताई केदारे यांचे मनःपूर्वक आभार मानले. दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग बांधवांना शुभेच्छा देत सन्मानित केले. यावेळी दिव्यांग भिमराव डोळस, एकनाथ मराडे, अर्जुन डहाळे, मोहनसिंग परदेशी, कविता परदेशी, रेखा रुपवटे, द्वारका पारधी, मधुकर दोरे आदींची उपस्थिती होती.प्रहार सेवक सपन परदेशी यांनी सांगितले—“समान हक्क, समान संधी आणि सर्वसमावेशक समाज घडवण्याचा संदेश देणाऱ्या आजच्या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. डॉ. केदारे नेहमीच दिव्यांग बांधवांसाठी संवेदनशीलतेने कार्य करतात.”वाकी बिटोरली ग्रामपंचायतीचा हा उपक्रम समाजातील संवेदनशीलता, सर्वसमावेशकता आणि प्रशासनाची बांधिलकी याचे उत्कृष्ट उदाहरण ठरल्याचे नमूद केले.
