
प्रतिनिधी शिवनाथ घोटकर, घोटी बु, दि. २०/१२/२०२५, वाकी डहाळेवाडी जिल्हा परिषद शाळा ,माननीय सौ.रेखा बोरसे.थेटे, मॅडम यांचा निरोप समारंभ चा कार्यक्रम संपन्न झाला, सौ.मॅडम यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करताना असे बोलले की समाज मंदिरातून शाळेचा प्रवास सुरू झाला असून शाळेच्या नवीन इमारती मॅडमच मार्गदर्शन लाभला आहे, निरोपाचे भावना व्यक्त करताना मी शाळा नव्हे तर माहेर सोडून चालले आहे, यावेळी गावातील महिलांनी सौ.मॅडम यांचा शाल, साडी, नारळ देऊन सत्कार केला. डहाळे वाडी येथे कोणतीही शाळा नसताना मॅडमनी समाज मंदिरामध्ये शाळा भरून विद्यार्थ्यांना 25 वर्षे शिक्षण दिले 25 वर्षे दिलेले योगदान शाळेत व विद्यार्थी साठी खूप मोलाचे होते म्हणून सर्वजण भावनिक झाले, या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आकाश भाऊ घुटे, माजी सरपंच संदीप कुंदे, शिवाजी जाखेरे, निवृत्ती घुटे, हिरामण डहाळे, प्रकाश भांगरे, बाळू डहाळे, अनिल डहाळे, बाळू जाखेरे, दिनेश डहाळे, माजी विद्यार्थी संतोष घुटे, दत्तात्रेय डहाळे, निलेश साबळे, सागर घुटे, ईश्वर साबळे, राहुळ जाखेरे, अभिषेक जाखेरे, व महिला मंडळ व सर्व गावकरी मुख्याध्यापक श्री घनश्याम कोळी, श्री महेंद्रा अलाई, तसेच मा.श्री शिवाजी थेटे, सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते,
