
प्रतिनिधी:-शिवनाथ घोटकर.घोटी बु, दि.२८/०६/२०२६ ,रोजी, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील पात्र ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी “राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना” राबविण्यात येत आहे. कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना सन्मानपूर्वक आर्थिक आधार उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.शासन निर्णय दिनांक १६ मार्च २०२४ नुसार, या योजनेअंतर्गत राज्यातील १०० मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५,००० रुपये मानधन प्रदान करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र कलाकारांना ३१ जुलै २०२६ पर्यंत पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.योजनेच्या मुख्य अटी आणि पात्रता:वय: अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.योगदान: कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षांचे उल्लेखनीय योगदान असावे.उत्पन्न मर्यादा: अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ६०,००0 रुपयांपेक्षा कमी असणे बंधनकारक आहे.
कोणाला मिळणार प्राधान्य? निवड प्रक्रियेत खालील प्रवर्गातील पात्र कलाकारांना विशेष प्राधान्य दिले जाईल:१. वयोवृद्ध कलाकार२. विधवा कलाकार३. परित्यक्ता महिला कलाकार४. दिव्यांग कलाकार५. आर्थिकदृष्ट्या दुर्बल साहित्यिक व कलाकारकोण पात्र ठरणार नाही?केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभ घेणारे व्यक्ती.अन्य कोणत्याही सरकारी मानधन किंवा नियमित आर्थिक सहाय्याचा लाभ घेणारे व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे (झेरॉक्स प्रती): १. आधार कार्ड२. रहिवासी दाखला३. वयाचा पुरावा४. उत्पन्न प्रमाणपत्र (दाखला) ५. कला/साहित्य क्षेत्रातील योगदानाची माहिती (मिळालेले पुरस्कार, प्रमाणपत्रे किंवा सन्मानपत्रांच्या प्रती)६. पासपोर्ट आकाराचा फोटो७. बँक खाते पासबुक८. शिफारस पत्र,
दल
