न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आहुर्ली च्या विद्यार्थी संघाला नागेश गायकर यांच्याकडून स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:- शिवनाथ घोटकर, दि.२४/०८/२०२६, रोजी, विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन मिळावे व खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, आहुर्ली येथील विद्यार्थी संघाला श्री. नागेश गायकर (तालुका अध्यक्ष – महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना तथा अध्यक्ष – शेतकरी कृती समिती) यांच्या कडून स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांची उपस्थितीया कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रांतील प्रमुख मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला.

प्रमुख पाहुणे: मा.श्री.संदीप भाऊ गुळवे (संचालक, म.वि.प्र.)मा.श्री.नागेश गायकर (तालुका अध्यक्ष, मनसे शेतकरी सेना व अध्यक्ष, शेतकरी कृती समिती) मा.श्री.महादू पाटील गायकर (चेअरमन, सोसायटी)मा.श्री.रघुनाथ खातळे (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती)मा.श्री.किसन गायकर, मा.श्री.शरद खकाळे, मा.श्री.तुकाराम गायकर, मा.श्री.गणेश मेदडे, मा.श्री.जनक कुटके.प्रशासकीय व क्रीडा अधिकारी:मा.श्री.प्रमोद चिंचोले (विस्तार अधिकारी, इगतपुरी)मा.श्री.ज्ञानेश्वर नांदनवर (केंद्र प्रमुख, आहुर्ली)मा.श्री.विजय सहाणे (केंद्र प्रमुख, वैतरणा)मा.श्री.दगडू तेलेऱे (तालुका क्रीडा अधिकारी)मा.श्री.विजय सोनवणे (क्रीडा अधिकारी)मा.श्री.अशोक उशीर (प्राचार्य, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, आहुर्ली) स्पर्धा यशस्वीतेसाठी शिक्षकांचे परिश्रमक्रीडा स्पर्धा व पोषाख वाटप कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.सहभागी शिक्षक व कर्मचारी वर्ग:श्रीमती पाटील मॅडम, श्रीमती तांबे मॅडम, रेवगडे सर, शेळके सर, श्रीमती नवले मॅडम, श्रीमती सोनवणे मॅडम, श्रीमती भोई मॅडम, सूर्यभान बोराडे (लिपिक), मा.श्री.तुकाराम शिंदे, मा.श्री.बाळासाहेब गोवर्धने, तसेच मा.श्री.पंडित सर, मा.श्री.म्हस्के सर, मा.श्री.महाजन सर, मा.श्री.देशमुख सर, श्रीमती जाधव, मा. शेख नूजहत, मा.श्री.क्षीरसागर सर, मा.श्री.धात्रक सर, मा.श्री.सानप सर, मा.श्री.गोडसे सर, मा.श्री.जाधव सर, मा.श्री.मते सर, मा.श्री.गायकवाड सर, मा.श्री.चव्हाण सर, श्रीमती .रुपवते मॅडम आणि मा.श्री.काळे सर.विद्यार्थ्यांनी खेळाच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करून शाळेचे व परिसराचे नाव उज्ज्वल करावे, असा विश्वास प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. क्रीडा गणवेश मिळाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी दाते व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *