चौथ्या राज्यस्तरीय कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध व्याख्याते अशोक कुमावत यांची निवड!

बातमी शेअर करा.

अमरावती(विशेष प्रतिनिधी):

दि.२४/०८/२०२६, रोजी, बी. एस. एफ. बहुउद्देशीय संस्था, अमरावती यांच्या वतीने आयोजित चौथ्या राज्यस्तरीय कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक तथा सुप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते श्री. अशोक लक्ष्मण कुमावत यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.श्री.अशोक कुमावत यांचा बहुआयामी परिचय:लेखक व साहित्यिक: ‘उठा तुम्हीही जिंकणारच’ या महाराष्ट्रासह सातासमुद्रापार पोहोचलेल्या सर्वाधिक खपाच्या लोकप्रिय प्रेरणादायी पुस्तकाचे लेखक.प्रकाशित पुस्तके: प्रेरणादायी लेख, काव्यसंग्रह, चारोळी संग्रह, ललित लेख आणि सामाजिक लेखनावर आधारित एकूण ७ पुस्तके प्रकाशित.सामाजिक व शैक्षणिक कार्य: ग्राहक पंचायत, गिरणा गौरव प्रतिष्ठान, अंधश्रद्धा निर्मूलन, साहित्य परिषद आणि पेन्शनर्स संघटना आदी संस्थांमध्ये विविध पदांवर उल्लेखनीय कार्य.बारा बलुतेदार संघाचे राज्य प्रमुख प्रवक्ते तथा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख. शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक व्यासपीठांवर त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेत.कविसंमेलनाची ठळक,

🔷वैशिष्ट्ये🔷सहभाग: राज्यभरातून ६० कवी या संमेलनात उत्स्फूर्त सहभाग घेणार आहेत.

🔷विशेष पुरस्कार🔷 या भव्य सोहळ्यात विशेष ‘समाज वैभव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.मान्यवरांची विशेष उपस्थिती:

🔷उद्घाटक🔷 सौ. अनुराधा मारचट्टीवार (समाजसेविका, हैदराबाद)प्रमुख अतिथी:सौ. ज्योती लोहार (समाजसेविका, खान्देश)सौ. कांचन जाधव (प्रसिद्ध निवेदिका)कु. पौर्णिमा झाल्टे (सेलिब्रिटी गेस्ट / अभिनेत्री, छत्रपती संभाजीनगर)सौ. सुमनताई मुठे (प्रसिद्ध साहित्यिक)श्री. सुहास टिपरे दिनांक व वेळ: ३० ऑगस्ट, सकाळी १०:०० वाजता, अमरावती जिल्ह्यातील सर्व कवी व रसिकांनी या भरगच्च आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक भूषण सरदार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *