माणिकखांब माध्यमिक शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. भाऊसाहेब बाबुराव आहेर यांचा गौरव क्रीडास्पर्धेतील उत्कृष्ट नियोजन व आयोजनाबद्दल ‘क्रीडासेवा प्रमाणपत्र’

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:- शिवनाथ घोटकर, दि.२९/०८/२०२६, रोजी .इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील ज्ञानगंगा माध्यमिक हायस्कूलचे क्रीडाशिक्षक तथा उपमुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब बाबुराव आहेर यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, उत्कृष्ट नियोजन व प्रभावी व्यवस्थापनाबद्दल जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने ‘क्रीडासेवा प्रमाणपत्र’ प्रदान करण्यात आले. म. वि. प्र. समाजाचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, यांच्या हस्ते हा सन्मान झाला.

विनावेतन सेवेपासून वटवृक्षापर्यंत प्रवास
शाळेच्या स्थापनेपासून विनामोबदला ज्ञानदानाचा वसा घेत श्री. भाऊसाहेब आहेर यांनी आर्थिक व कौटुंबिक अडचणींवर मात केली. पैशांपेक्षा विद्यार्थ्यांचे भविष्य श्रेष्ठ मानत त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे ग्रामीण भागातील ही शाळा ज्ञानपंढरी बनली. त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे शाळेचा दहावीचा निकाल सातत्याने ९९ टक्के लागतो.

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार व खेळाची आवड
केवळ शिक्षण नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही त्यांनी विशेष योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट, कबड्डी, कुस्तीत अनेक विद्यार्थी जिल्हा, तालुका स्तरावर चमकले असून विद्यार्थिनींनी कुस्तीत पदके जिंकली आहेत. त्यांच्या प्रेरणेने व शिस्तीमुळे अनेक तरुण पोलीस दलात रुजू झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्यापासून स्वच्छतेपर्यंत काळजी घेणारे श्री. आहेर हे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरले आहेत.

या कामगिरीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *