प्रौढ महिला महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न,

बातमी शेअर करा.

संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी संपादक: माया मुक्ताई, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रौढ महिला महाविद्यालय, संभाजीनगर येथे विद्यार्थिनींसाठी अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका रंधवे मॅडम यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष जगदीश परदेशी सर, तसेच महादेव डावरे सर, सूर्यकांत रडजे सर आणि दिलीप राठोड सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काटकर मॅडम यांनी केले, तर शिंगरकर मॅडम यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि अंधश्रद्धेविरोधात जनजागृती व्हावी, या उद्देशाने विविध प्रयोग व प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. अनेक तथाकथित चमत्कारांमागील वैज्ञानिक कारणे सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आली.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे विविध प्रश्न विचारले. त्यांच्या मनातील शंका व प्रश्नांचे निरसन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थिनींना अंधश्रद्धेकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याची आणि प्रत्येक गोष्टीमागील सत्य व वैज्ञानिक कारण तपासण्याची प्रेरणा मिळाली.“प्रश्न विचारा, सत्य तपासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारा,” हा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थिनींना देण्यात आला.कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *