
प्रतिनिधी प्रा.ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे, अहिल्यानगर.
गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी प्रभू रामचंद्राची रामनवमी मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात जगभरात दरवर्षी पार पाडली जाते.हिंदू धर्म ग्रंथानुसार पूर्वीच्या काळी रावणाने समाजामध्ये जे काही मोठमोठे अत्याचार चालवले होते. ते रावणाचे सर्व अत्याचार संपुष्टात काढण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णू ने मृत्यूच्या जगात श्री राम म्हणून अवतार घेतला. श्री रामचंद्र यांचा जन्म चैत्र शुक्राणू मेला राणी कौशल्याच्या पोटी राजा दशरथाच्या घरी झाला. रामायणनुसार अयोध्येचा राजा दशरथ याला तीन बायका होत्या. परंतु फार काळ राजा दशरथला संततीचे सुख अनुभवता आले नाही. राजा दशरथ नेहमी नाराज आणि अस्वस्थ राहत असे. पुत्र प्राप्तीसाठी राजा दशरथ यांना वशिष्ठ ऋषींनी पुत्र कामिस्टी यज्ञ करण्याची कल्पना दिली होती. म्हणून राजा दशरथानी नेमाप्रमाणे सर्व काही पूर्तता व धार्मिक विधी पार पाडले. त्यानंतर यज्ञ चालू असताना त्या यज्ञकुंडातून एकदाही पुरुष हातात खिरीची वाटी घेऊन बाहेर आला. आणि यज्ञविधीचा कार्यक्रम संपल्यानंतर महर्षी ऋषी यांनी शेती नाही पत्नींना खीरीची वाटी खायला दिली. खीर खाल्ल्यानंतर काही नाही महिन्यांनी तिन्ही हि राण्या गरोदर राहिल्या. आणि तेथून पुढे बरोबर नऊ महिन्यानंतर राजा दशरथे राणी कौशल्याने राम भगवान विष्णूचा सातवा अवतार; आणि कैकयी यांनी भरत आणि सुमित्रा यांना लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला. जन्मदृष्ट प्राण्यांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला होता. .. रामनवमी संपूर्ण भारत देशामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते. राम नवमी या कालावधीमध्ये प्रत्येकाच्या घरासमोर सडा रांगोळी काढली जाऊन नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले असते. खेडोपाडी गावात शहरांमध्ये रामनवमीचा हा येणारा जल्लोष मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. चैत्र नवरात्रीचे समाधी रामनवमीच्या दिवशी होते. पूर्ण भारत देशामध्ये सर्व भाविकांना याची कल्पना आहे की: हिंदू धर्म ग्रंथानुसार भगवान श्री राम जी चा जन्म या दिवशी झाला होता. म्हणून भारत देशातील प्रत्येक भक्त हा रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. थोडक्यात ही शुभ तिथी रामनवमी म्हणून साजरी करतात. आणि त्या दिवशी आपल्या भारत देशामध्ये जेवढ्या पवित्र नद्या आहेत. त्या त्या परिसरातील लोक त्या नद्यांमध्ये गंगा स्नान करतात. पवित्र नद्यांमध्ये गंगा स्नान केल्यानंतर आपल्या हातून कळत नकळत झालेली जी काही लहान-मोठी पापे असतील ती सर्व धुवूनजातात .असा मोठा आपल्या भारत देशातील भाविकांचा समज आहे. आणि तो मान्य ही करावा लागेल. भगवान विष्णूचा अवतार मानण्याची प्रथा आहे. भगवान विष्णू पृथ्वीवरील जे काही राक्षस आहेत .त्या सर्व राक्षसांचा नायनाट करण्यासाठी त्रेता युगात श्रीराम म्हणून मानव अवतार घेऊन जन्मास आले. प्रभू रामाला मर्यादा पुरुषोत्तम असे देखील म्हणतात. कारण प्रभू रामचंद्र आपल्या कालावधीत आणि संपूर्ण आयुष्यात विविध प्रकारची अशी लहान मोठी संकटे सहन करूनही प्रभू रामचंद्र यांनी कधीही हार मानली नाही. हार मान्य हे त्यांच्या रक्तातच नव्हते. जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक संकटाशी त्यांनी आपल्या सामर्थ्याच्या जोरावर सामना करून आपला एक आगळा वेगळा अशा प्रकारचा आदर्श त्यांनी निर्माण केला. आणि प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी हा आपला आदर्श कधीच सोडला नाही . शेवटपर्यंत प्रभू रामचंद्र हे सन्मानानेच जगले आहेत. प्रभू रामचंद्र हे सर्वांनाच वंदनीय असे आहेत.सर्वजण रामनवमीच्या दिवशी त्यांची अगदी मन भावे पूजा करतात. संपूर्ण कुटुंबामध्ये त्या दिवशी अतिशय मनमोहक आणि आनंदाचे अशा प्रकारचे वातावरण निर्माण झालेले असते..लहानपणापासूनच प्रभू रामचंद्राच्या कुटुंबातील वातावरण हे सुसंस्कृत आणि धार्मिक वृतीचेअशा प्रकारचे होते. त्यांचे वडील राजा दशरथ आणि आई कौशल्या यांनी श्रीरामचंद्रांवरती प्रथमपासूनच अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार केले होते. प्रभू रामचंद्रांचा स्वभाव संवेदनशील. विनयशील आणि अति नम्र अशा प्रकारचा होता. राम हा भगवान विष्णूचा अवतार आहे .आणि त्याला श्रीराम आणि श्री रामचंद्र नावाने ओळखले जाते. . श्रीराम हे भारतामध्ये अत्यंत पूजनीय आणि एक आदर्श पुरुष म्हणून प्रसिद्ध होते. आणि जगातील अनेक देशांमध्ये श्री राम यांना आदर्श म्हणून पुजले जाते. याला पुरुषोत्तम या शब्दांनी सुशोभित केले आहे. कामाच्या पत्नीचे नाव सीता असे होते. त्यांना तीन भाऊ होते. लक्ष्मण.भरत आणि शत्रुघ्न. हनुमान हा श्रीरामाचा सर्वात मोठा भक्त मानला जातो. त्या काळामध्ये ज्याने अधर्माचा मार्ग स्वीकारला होता. तो अधर्मि रावन होय. आणि अशा या अधर्मी रावणाचा वध प्रभू रामचंद्र यांनी केला आहे. श्रीरामाची मर्यादा पुरुषोत्तम अशी ख्याती तेव्हापासून निर्माण झालेली आहे. आणि म्हणून संपूर्ण देशभरामध्ये श्रीराम नवमीचा हा महोत्सव मोठ्या थाटामाटात आणि आनंदामध्ये साजरा केला जातो. श्रीराम हे सर्वांना पूजनीय अशा प्रकारचे आहेत. म्हणून मी शेवटी प्रभू रामचंद्र बदल जाता जाता असे म्हणेल की; राम ज्यांचे नाव आहे.अयोध्या ज्यांचे गाव आहे.असा हा रघुनंदन आम्हाससदैव वंदनीय आहे..!! मी माझ्या संपूर्ण देशवासीयांना रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा देतो.
