23 मार्च भगतसिंग राजगुरू सुखदेव बलिदान दिवस,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधीः- ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे, जि. अहिल्यानगर

दि. 23/03/2026, भगतसिंग; राजगुरू; सुखदेव भारत मातेसाठी तुम्ही लढलात! मरणाला उरी कवटाळून. तुम्ही हसत हसत फासावर चढलात! आपल्या या पवित्र आणि सुजलम सुख ला माझ्या भारत देशामध्ये अनेक क्रांतिकारक होऊन गेले की त्यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्या कामी इंग्रजांना वठणीवर आणले. आणि अथक परिश्रमातून शेवटी ब्रिटिशांना आपल्या भारत देशातून या थोर क्रांतिकारकांच्या दहशतीमुळे शेवटी भारत देशातून जावे लागले. या थोर क्रांतिकारकांपैकी प्रामुख्याने भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या तीनही शूरवीरांचा प्रामुख्याने उल्लेख करणे क्रम प्राप्त ठरणार आहे. कारण या थोर तरुण क्रांतिकारकांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अतिशय मोलाच्या अशा प्रकारचे योगदान आहे. त्यांनी अगदी तरुण वयामध्ये घरादाराचा आणि आपल्या कुटुंबाचा यतकिंचितही विचार मनात न आणता स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी घेतली. त्या काळामध्ये ब्रिटिशांनी भारतीय जनतेला वेठीस धरले होते. भारतीय माणसाला गुलामाप्रमाणे वागणूक दिली जात होती. कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते. जास्तीत जास्त काम आणि अतिशय कमी प्रमाणात दाम अशा प्रकारची अवस्था भारतीयांची झाली होती. इंग्रज अधिकारी भारतीय जनतेचा अतिशय अमानुष अश्या प्रकारचा छळ करीत होते. थोडक्यात सारांश रूपाने भारतीयांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत असे^^ या प्रकारच्या अवस्था भारतीय जनतेची झाली होती. हे सर्व दृश्य या तरुण क्रांतिकारकांच्या चाणाक्ष दृष्टीने हेरले. आणि भगतसिंग राजगुरू सुखदेव या तीनही तरुण शूरवीरांनी मनोमन असे ठरवले की;काही झाले तरी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसने नाही. या प्रकारची खून गाठ त्यांनी आपल्या मनात बांधली. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव याथोर भारतीय क्रांतिकारकांना इंग्रजांनी 23 मार्च 1931 रोजी ब्रिटिशांविरुद्ध कटकारस्थाने करीत आहेत. भारतीयांना साथ देत आहेत. आणि अनेक कारणांचा परामर्श घेऊन व विविध प्रकारच्या आरोपाखाली लाहोर तुरुंगामध्ये फाशी देण्यात आले. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी लहान वयातच बलिदान दिले. या तीन क्रांतिकारकांना मनोभावे आदरांजली वाहण्यासाठी 23 मार्च हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. भगतसिंग व त्यांचे सहकारी यांचे स्वातंत्र्य मिळवण्यााठी मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत होते. देशाच्या कानाकोपऱ्यात या क्रांतीकारकांच्या नावाची चर्चा चालू होती. त्या मुळे संपूर्ण भारतीय जनता त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागली होती. या क्रांतिकारकांची ही वाढती लोकप्रियता पाहून इंग्रज सरकारने धसका घेतला. लाहोर कट खटल्याच्या सुनावणीमुळे भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांना परत एकदा मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळून त्यांच्या लोकप्रियतेत आणखी भर पडेल अशी सरकारला भीती वाटली. त्यामुळे सर्व संकेत व तत्वे धाब्यावर बसवून हा खटला सरकारने गुप्तपणे चालविला. या खटल्यात भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग सुखदेव राजगुरू यातील महान क्रांतिकारक फाशी देण्यात आले. इन्किलाब जिंदाबाद च्या घोषणा देत हे तीनही महान क्रांतिकारक आपल्या या भारत देशाच्या स्वातंत्र्य करिता आणि जी हजारो वर्षे भारतीय जनता ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली वावरत होती त्या जनतेला ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी हसत हसत फासावर चढले . मोठ्या आनंदाने व अति उत्साहाने भगतसिंग राजगुरू सुखदेव हे तीनही क्रांतिवीर हसत हसत मृत्यूला सामोरे गेले.आणि शेवटी जाता जाता असे म्हणावेसे वाटते कीकोणी मवांळ होतेजहाल कोण होते,देशभक्तांच्या नयनी फक्तस्वातंत्र्याचे स्वप्न होते, या तिन्ही थोर क्रांतिकारकांना माझा मानाचा मुजरा. = जय हिंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *