
प्रतिनिधी प्रा.ज्ञानेश्वर कृष्णाची बनसोडे, अहिल्यानगर,
10 मार्च 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, आपल्या या पवित्र अशा सुजलाम सुफलाम भारत देशातील भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले या होत्या. सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या संसारापेक्षा समाजातील अशिक्षित अशा व दीन-दुबळ्या स्त्रिया व दलित समाजाचा संसार सुखाचा करण्यासाठी अविस्रांत कष्ट घेतले. सावित्रीबाई यांनी स्वतः पासून शिक्षणाची सुरुवात केली. भारतामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. अशा या कर्तृत्ववान सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नेवसे पाटील घराण्यात झाला . सावित्रीबाई फुले यांच्या कार्य काळात ज्ञानदानाचे हे पवित्र कार्य करीत असताना सावित्रीबाई फुले यांना अनंत अडचणी आल्या परंतु त्यांनी या सर्व अडचणीवर मात करून आपले जे स्री पवित्र ध्येय आहे ते पूर्ण केले. अनेक मोठमोठी संकटी त्यांच्यावरती आली.सर्व संकटावर मात करून त्यांनी आपले जे शिक्षणाचे कार्य आहे ते अखेर तडीस नेले. सावित्रीबाईंनी समाजामध्ये ज्या काही अनिष्ट चालीरीती; रूढी; प्रथा ;परंपरा वाढीस लागलेल्या होत्या .त्या समूळ पणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सावित्रीबाईंच्या या प्रयत्नामुळे आज अनेक स्त्रिया समाजामध्ये पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि समाजातील विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांपेक्षा दोन पावलेही पुढेच आहेत असे चित्र सध्याचे युगामध्ये आपणास पहावयास मिळत आहे. हे अनमोल कार्य सावित्रीबाईच्या महान कार्याचे फलित आहे. असे म्हटल्यास वावगे ठरू नये.असे माझे प्रामाणिक मत आहे.
समाजातील हिन -दिन; गोर-गरीब ; अनाथ; या सर्वांचा विकास झाला पाहिजे.
अशा प्रकारची मनापासून ची तळमळ सावित्रीबाई फुले यांची होती. स्त्रियां शिक्षित झाल्या पाहिजे. चूल आणि मुल अशा प्रकारची
सावित्रीबाईंनी ऐहिक सुखाचा त्याग करून ज्योतिबांच्या समाजकार्य स्वतःला झोकून दिले.
स्री शिक्षण; विधवांचा
पुनर्विवाह ;अस्पृश्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न .या सर्व लढ्यामध्ये सावित्रीबाई ज्योतिबांच्या बरोबर आघाडीवरच होत्या. त्या काळामध्ये समाजामध्ये विषमता निर्माण झालेली होती. ही विषमता नष्ट करण्यासाठी सावित्रीबाईंनी अविरत कष्ट सोसले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन सामान्य श्रिया सारखं नव्हतं. इतर सर्व सामान्य स्त्रियांसारखं लग्न करून प्रपंच करावा.; मुलाबाळांमध्ये रमून जावं .घरदार सजवावे,;
पैसा जमावावा.; ऐसे आरामात जीवन जगाव;असं सावित्रीबाईंना कधीच वाटलं नाही ^^समाजाचा प्रपंच हाच आपला प्रपंच आहे, अशा प्रकारची खून गाठ त्यांनी मनाशी बांधून आपलं जे स्री शिक्षणाचे ज्ञानदानाचे कार्य आहे.ते कार्यपुढे जोमाने चालू ठेवले.त्यात तसूभर ही त्यांनी माघार घेतली नाही. सावित्रीबाईंनी त्या काळामध्ये अनेक अनाथ व गरिबांचे मातृत्व देखील स्वीकारलं होतं.
महान क्रांतिकारी सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या मनात लहानपणापासूनच गोरगरिबांच्या बाबतीत कणव; जिव्हाळा आणि प्रेमाची भावना होती. सावित्रीबाई फुले या लहान पासूनच हुशार; धीट; आणि दयाळू असे अनेक प्रकारचे गुण त्यांच्या अंगात होते.. सावित्रीबाई या अनेक आघाड्यांवर कार्यरत असलेले एक तुफान वादळ होतं.सावित्रीबाईंनी त्या काळामध्ये विधवा विवाह ;बालहत्या प्रतिबंधगृह ;श्रिया व सुद्रांसाठी शाळा; रात्र शाळा ;अनाथ बालकाश्रम; अशा प्रकारचं महान असं कार्य केल्यामुळे त्या काळातील स्त्रियांना शिक्षणाचे धडे मिळू लागले. ही सर्व किमया सावित्रीबाईंची आहे. त्या काळातील समाज हा शिक्षणापासून दुर्लभ झालेला असल्यामुळे अंधश्रद्धेमध्ये पूर्णपणे गुरफटून गेला होता. या अंधश्रद्धा पिढीत समाजाला शिक्षणाचे धडे देऊन विशेषतः स्त्रियांना शिक्षणाचा महामंत्र दिला. आणि स्री शिक्षणाचा पाया भारतामध्ये त्यांनी घातला
. स्री शिक्षणाचे आद्य जनक म्हणून सावित्रीबाईंचा उल्लेख हा अभिमानाने करावा लागतो. कारण समाजकार्य करीत असताना त्यांनी स्वतःच्या प्रपंचाचा तसूभरही विचार न करता समाजकार्यामध्ये उडी घेऊन स्री शिक्षणाचे आपले जे महान अशा प्रकारचे उद्दिष्ट होते ते पूर्ण केले . म्हणून ^स्री शिक्षणाच्या आद्य जनक सावित्रीबाई यांच्या नावाचा उल्लेख अभिमानाने करावासा वाटतो.
सावित्रीबाईं फुले यांच्या आठवणींना व जळा देता देता शेवटी मी असेही म्हणेल की;
सावित्रीबाई तुम्हीच खऱ्या
स्री शिक्षणाच्या कैवारी
तुमच्यामुळेच शिकती आहे
आज प्रत्येक नारी, जय हिंद
