“अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती ” यांचे विद्यमाने घोटी शहरात अतिशय भव्य – दिव्य असा कलावंतांचा महाक्रांती मेळावा संपन्न झाला,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर,घोटी.बु.                          रविवार दि.08/03/2026, रोजी लॉन्स, घोटी बु. येथे कलावंतांचा मेळावा आयोजित केला होता, यामध्ये अनेक कलाकारांचा सन्मान तसेच पुरस्कार वितरण करण्यात आलं, खासकरून वारकरी भजनी मंडळ यांचा सत्कार करून प्रमाणपत्र देण्यात आले, तरी कवी / गायक / शाहीर/साहित्यिक / लेखक / अभिनेते अभिनेत्री / निर्माता दिग्दर्शक / संगीत विशारद / सुगम संगीत / तमाशा कलावंत / लावणी डान्सर / कथ्थक नृत्य / ह. भ. प. वारकरी / वाघे मुरळी / गोंधळी / बहुरूपी / पोतराज / आराधी/तृतीय पंथी कलावंत / संबळ सनई ताफा वादक/ब्रास बँड वादक / बँजो पार्टी वादक / ऑर्केस्ट्रा कलावंत / कराओके गायक /महिला आणि पुरुष ढोल पथक , आदिवासी-आगरी लोककलापथक , तबलावादक, हार्मोनियम वादक ढोलक, ढोलकीवादक-किबोर्ड-अॅक्टोपॅडवादक-पखवाज वादक-टाळवादक-विनावादक-बासरी वादक, असे विविध प्रकारचे स्तरातील कलावंत यांची “अधिकृत नाव नोंदणी करून प्रमाणपत्र देण्यात आले, यावेळी कार्यक्रमात नगर जिल्हा ठाणे जिल्हा पालघर जिल्हा नाशिक जिल्हा पुणे जिल्ह्यातील अनेक कलावंत आले होते, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ-हरसुल, कळवण, सिन्नर, अकोले, शहापूर तालुक्यातूनही अनेक कलावंत उपस्थित होते, अनेक कलावंती मंचावर कला ही सादर केली , भजन गण गवळण वगनाट्य वाघ्या मुरळी जागरण गोंधळ आदिवासी कांबडनृत्य, तारपा नृत्य, बोहडा, गायन, नृत्य, अशा अनेक कल्यांचे सादरीकरण झाले, या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने कलावंत सहभागी झाले होते, तसेच प्रमूख पाहुणे म्हणुन ज्यांचे उपस्थिती लाभली असे, जेष्ठ मा.आमदार.श्री.शिवराम(दादा)झोले.साहेब, मा.जिल्हा प.सदस्य श्री गोरख(भाऊ)बोडके, समाज सेवक डॉ.सुधाकरजी जगताप, मा.श्री.आण्णा डोंगरे, मा. उपनगराध्यक्ष इगतपुरी, शशिकांत उबाळे, मा.श्री.केशवजी बोडके,ॲड.सोपान चव्हाण, पत्रकार संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष श्रीराम भाऊ खुर्दळ, राजेंद्र दोंदे नगरसेवक, बुद्ध विहार कमिटी इगतपुरी अध्यक्ष भास्कर दादा बर्वे साहेब, समाजसेवक भास्कर देहाडे, सौ वंदना बाळासाहेब सोनवणे, अ.जा.ज . ग्रा.प .स . ई .अध्यक्ष, पत्रकार साहित्यिक माया मुक्ताई,  प्रियंका राजेश दोंदे, नगरसेवक

असे अनेक मान्यवर उपस्थित होते. यथोचित कला सादरीकरण बघून अनेक मान्यवरांना लोकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ” कलावंतांना अधिकृत कायदेशीर प्रमाणपत्र” देण्यात आला ह्या मेळाव्यासाठी अविरत परिश्रम घेणारे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष ह.भ.प.नानासाहेब सोनकांबळे, आणि इगतपुरी ता.प्रतिनिधी सुनिल डि. पगारे, नाशिक जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब सोनवणे, इगतपुरी तालुका प्रतिनिधी श्री.हिरामणजी कौटे.साहेब, नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष शाहिर सदाशिव भुजंगे, इगतपुरी ता.सचिव ह.भ.प. शिवनाथ घोटकर, त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष उत्तमराव ठमके,सरपंच कैलास भाऊ घारे, कार्यक्रम यशस्वीतेसाठी सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणणारे जेष्ठ कवी विजयकुमार कर्डक, त्याच बरोबर सम्पूर्ण सभागृहात हॉल भरून खचाखच तुडुंब गर्दी करणारे… महाक्रांती मेळाव्याच्या भव्य कला मंचावर “कला” सादरीकरणाच्या संधी साठी उत्सुक असणारे ग्रामीण भागातील हजारो कलावंत / साहित्यिक / वारकरी – भजनी मंडळ यांचे मी अगदी मनापासून आभारी आहे….आपल्या सेवेसाठी कार्यरतगायक – सोमनाथ गायकवाड.साहेब,संस्थापक – अध्यक्षअखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रम संपला आता जाहीर केलं,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *