
प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर, घोटी.बु, रविवार दि.08/03/2026, तारखेला इंद्रप्रस्थ लॉन्स, घोटी बु.ता.इगतुरी, जि नाशिक, येथे कलावंतांचा मेळावा आयोजित केला आहे, यामध्ये अनेक कलाकारांचा सन्मान तसेच पुरस्कार वितरण केले जाणार आहे,

खासकरून वारकरी भजनी मंडळ यांचा सत्कार केला जाणार आहे, तरी कवी / गायक / शाहीर/साहित्यिक / लेखक / अभिनेते अभिनेत्री / निर्माता दिग्दर्शक / संगीत विशारद / सुगम संगीत / तमाशा कलावंत / लावणी डान्सर / कथ्थक नृत्य / ह. भ. प. वारकरी / वाघे मुरळी / गोंधळी / बहुरूपी / पोतराज / आराधी/तृतीय पंथी कलावंत / संबळ सनई ताफा वादक/ब्रास बँड वादक / बँजो पार्टी वादक / ऑर्केस्ट्रा कलावंत / कराओके गायक /महिला आणि पुरुष ढोल पथक , आदिवासी-आगरी लोककलापथक , तबलावादक, हार्मोनियम वादक ढोलक, ढोलकीवादक-किबोर्ड-अॅक्टोपॅडवादक-पखवाज वादक-टाळवादक-विनावादक-बासरी वादक, असे विविध प्रकारचे स्तरातील कलावंत यांची “अधिकृत नाव नोंदणी सुरु झाली आहे. तरी जास्तीत जास्त युवक-युवती-महिला-पुरुष कलावंतांनी आपली हक्काची नोंदणी करावी…. आणि आपला ” कलावंत महाक्रांती मेळावा” यशस्वी करावा, ही विनंतीआपण ह्या कलावंत महाक्रांती मेळाव्यात सहभागी झालात म्हणून आपणास आपली यथोचित कला सादरीकरण बघून “अधिकृत कायदेशीर प्रमाणपत्र” कलावंत ओळख पत्र आणि “गुलाब पुष्प” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे… याची सर्व कलावंतांनी नोंद घ्यावी…!कलावंत / साहित्यिक / वारकरी यांची नोंदणी सुरु आहे….ज्या वारकऱ्याच वय वर्षे 50 पूर्ण असेल, गायनाचार्य, किर्तनकार, प्रवचनकार, मृदंगाचार्य, टाळकरी, या सर्वांना शासनामार्फत (राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना,) दर महा 5000, हजार रुपये मानधन चालू आहे त्याकरता सर्वप्रथम समितीकडे तुमची नोंद झाली पाहिजे, शासनामार्फत ही रक्कम दर महिन्याला डीबीटी मार्फत जमा केली जाते, त्यासाठी आम्ही केलेला छोटासा प्रयत्न,

सर्व कलावंतांनी, वारकरी भजनी मंडळांनी, नाव नोंदणी साठी, या नंबर वरती संपर्क साधा, 📲9011160503 📲9067790503,

वरील फोटो,क्र.1) घोटी बस स्थानकावर निमंत्रण पत्रिका दिल्या नंतर, वाचन करताना. प्रवाशी वारकरी, वरील फोटो,क्र. 2) नोंदणी फॅम भरताना, ह.भ.प.नानासाहेब सोनकांबळे, (नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष अ.भा.क.ना.समिती,)
