
इगतपुरी: प्रतिनिधी:-शिवनाथ घोटकर, दि.१५/११/२०२६,रोजी, ग्रामीण भागची पत्रकारिता सत्याची कास धरणारी आहे, कोरोनाच्या काळात वृतपत्र माध्यमाचे अतोनात नुकसान झाले, त्यामुळं सध्यस्थितीत वृतपत्र क्षेत्रात नव्याने आलेले बदल स्वीकारा, ए आयच्या बदलाचे आव्हाण असले तरी यात संयम राखून सद्य स्थितीत प्रवाहाच्या बाजूला राहून पत्रकारिता करणे आवश्यक आहे, त्यामुळं बदलत्या काळानुसार बदला असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार तथा दैनिक देशदूतचे संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी दि 15 नोव्हेंबर 2026 रोजी घोटी ता. इगतपुरी जि नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनात केले,
पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य संचलित पत्रकार संरक्षण समिती नाशिक जिल्हा आयोजित, राज्यस्तरीय पत्रकार संमेलन घोटी (ता इगतपुरी जि नाशिक) येथील जैनभवन सभागृहात झाले. सकाळी 11.00 वाजता सुरु झालेल्या कार्यक्रमात पहिल्या सत्राचे उदघाटन पत्रकार महर्षी बालशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार फुले वाहून करण्यात आले,या पत्रकार संमेलनाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक विनोद पत्रे होते,यावेळी व्यासपीठावर राज्य उपाध्यक्ष राम खुर्दळ,राज्यसचिव अनिल चौधरी,नाशिक जिल्हा अध्यक्ष देवचंद महाले हे व्यासपीठावर होते.यासत्राच्या शेवटी जेष्ठ पत्रकार दिवंगत भोर गुरुजी सन्मान प्रदान करण्यात आला,यात शाल,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ग्रामगिता भेट देण्यात आली,नाशिक विभागात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज आभियानात दुगाव ता नाशिक ग्रामपंचायत, हिरडी (ता त्रंबक) येथील नैसर्गिक शेती करणाऱ्या भगिनी, स्वच्छतादूत बंटी पगारे, सामाजिक पत्रकारिता पुरस्कार पालघर जव्हार येथील मनोज कामडी, निसर्ग पक्षी जंगल संवर्धक प्रल्हाद पवार (जातेगांव ता त्रंबक) यांना तर आदिवासी संस्कृती परंपरा साहित्य सन्मान देवचंद महाले यांना देण्यात आला,त्यानंतर “ग्रामीण पत्रकारांचे उपेक्षित जगणं”विषयावर विशेष स्मरणीका प्रकाशित करन्यात आली.अध्यक्षीय मनोगतात पत्रकार संरक्षण समिती संस्थापक तथा दूरदर्शन पिटीआय प्रतिनिधी विनोद पत्रे यांनी परस्पर वशिल्याने शासन निर्मित पत्रकारांच्या समित्या बाबतीत तीव्र आक्षेप नोंदवला. संघटना वाढल्या परस्पर समित्या नेमल्याने खऱ्या कष्टाळू ग्रामीण पत्रकारांची उपेक्षा मात्र अनेक वर्ष कायमच आहे असे वरखड विचार मांडले,

दुपारच्या सत्रात "ग्रामिन पत्रकारांची उपेक्षा" विषयावर जेष्ठ पत्रकार राम खुर्दळ यांचे व्याख्यान झाले, यावेळी ग्रामीण पत्रकाराना त्यांच्या कष्टाचा उचित मोबदला मिळावा, तसेंच बस रेल्वेत 50 टक्के सवलत, जिमाकात नोंद, विविध मंत्री व नेत्त्यांनी शिफारस केलेल्या शासन निर्मित समित्या परस्पर नेमण्याच्या प्रकाराचा निषेध करण्यात आला,शासनाने ग्रामीण पत्रकाराना ग्रामदूत म्हणून मान्यता द्यावी,अधिस्वीकृतीत जाचक अटी शर्ती काढून ग्रामीण पत्रकाराना 50 टक्के जागा द्याव्या, पदवीधर तसेच शिक्षक आमदाराप्रमाणे पत्रकारांचे प्रतिनिधी संसद विधिमंडळात असावे,पाल्याना मोफत शिक्षण, कुटुंबे व स्वतःला आरोग्य विमा व मोफत उपचार योजना द्यावी, अश्या मागण्यासाठी हात वर जरून ठरावं केले,दरम्यान याबाबतीत 19 असे एकमुखी ठरावं करण्यात आले.पुढील महिन्यात त्या-त्या शासन विभागात यासंदर्भात पत्र देण्यात येईल प्रसंगी आंदोलने केली जातील असा विचार राम खुर्दळ यांनी मांडले.यावेळी व्यासपीठावर कृषी अभ्यासक पत्रकार ज्ञानेश उगले, जेष्ठ पर्यावरणवादी डॉ संदीप भानोसे हे होते.याप्रसंगी पत्रकारांचे अध्यापक श्रीकांत सोनवणे यांनी हीं ग्रामीण पत्रकारांचे राज्यस्थरीय संमेलन ते हीं घोटी सारख्या ग्रामीण भागात यशस्वी पणे घेणे हे नियोजन अतिशय प्रेरक असल्याचे विचार मांडले, पत्रकार ज्ञानेश उगले यांनी कृषी पत्रकारिता करताना अनुभव मांडले तर डॉ संदीप भानोसे यांनी आपल्या अखंडित पर्यावरण प्रबोधन, कौटुंबिक सलोखा, नात याबद्दलच्या कार्याबद्दल मांडणी केली.

या प्रसंगी पत्रकार संमेलनाच्या संयोजन समितीतील विभागीय प्रमुख माया मुक्ताई,स्थानिक स्वागताध्यक्ष सुनील पगारे, शिवनाथ घोटकर,कार्याध्यक्ष सुनील वाघ,जिल्हाउपाध्यक्ष भारत चव्हाण,अरुण शिंदे,जितेंद्र साठे,पांडुरंग दोंदे (त्रंबक अध्यक्ष), प्रदीप कापसे (निफाड अध्यक्ष), वाल्मिक ठोंबरे,नरहरी रोटे, अश्विनी धुळे, राजेंद्र भांड,यांचेसह विदर्भातील,वर्धा,आर्वी,अमरावती, पालघर,जव्हार,सोलापूर,नांदेड,देगलूर,राळेगाव,कळंब,राज्यभरातील पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.
फोटो ओळी :
1) पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य संचलित पत्रकार संरक्षण समिती नाशिक जिल्हा आयोजित राज्यस्थरीय पत्रकार संमेलनात कै पत्रकार सुरेश भोर स्मृति पुरस्कार सन्मानार्थी व मान्यवर मार्गदर्शक..
2) दुसऱ्या छायाचित्रात राज्यस्थरीय पत्रकार संमेलनातील उपस्थित मान्यवर व उपस्थित पत्रकार प्रतिनिधी,,
3) पत्रकारांच उपेक्षिय जगणं विषयावर स्मरणीका प्रकाशन करताना जेष्ठ पत्रकार संपादक शैलेंद्र तनपुरे, सोबत पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक विनोद पत्रे, राज्य उपाध्यक्ष राम खुर्दळ…
