नाशिक जिल्हास्तरीय आदर्श शाळा व शिक्षक पुरस्कार २०२६ जाहीर; इगतपुरी तालुक्याचा डंका!

बातमी शेअर करा.

इगतपुरी प्रतिनिधी: शिवनाथ घोटकर, GSK कंपनी (नाशिक) आणि YUVA Unstoppable (अहमदाबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्हास्तरीय आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक आणि शिक्षक पुरस्कार २०२६ नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये इगतपुरी तालुक्याने आपले विशेष वर्चस्व सिद्ध केले आहे.

🔅 पुरस्काराची ठळक वैशिष्ट्ये: 🔅जिल्ह्यातील ११६ शाळांमध्ये स्मार्ट क्लासची सुविधा. १४ शाळांना आधुनिक भौतिक व शैक्षणिक सुविधा पुरवून ‘मॉडेल स्कूल’ बनवण्यात आले. शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील उल्लेखनीय योगदानासाठी शिक्षकांचा गौरव. इगतपुरी तालुक्यातील प्रमुख मानकरी: आदर्श शिक्षक पुरस्कार टिटोली श्री. सिद्धार्थ सोमा सपकाळे (जि.प. प्राथमिक शाळा, टिटोली) आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार: श्री. श्रीकांत काशिनाथ बोरसे (घोटी मुली नं. १ शाळा) आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार: श्री. अमोल ढेरिंगे (वैतरणा न्यू इंग्लिश स्कूल) विशेष पुरस्कार: श्री. माणिक बाळाजी भालेराव (तंत्रस्नेही शिक्षक, बोरटेंभे शाळा)

💠पुरस्कार वितरण सोहळा:💠 दिनांक: रविवार, २७ सप्टेंबर २०२६ वेळ:सकाळी १०:०० ते दुपारी २:०० स्थळ:गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिकप्रमुख उपस्थिती:हा सोहळा महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री मा. ना. दादाजी भुसे ,यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. याशिवाय खासदार मा. खा. भास्कर भगरे, खासदार मा. खा. राजाभाऊ वाजे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. ओमकार पवार,, जि.प. शिक्षणाधिकारी (प्राथ.) मा. साईलता सामलेटी यांच्यासह GSK कंपनी व YUVA Unstoppable चे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.—या सर्व यशस्वी शिक्षक व मुख्याध्यापकांवर नाशिक जिल्ह्यातून अभिनव वर्षाव होत असून, त्यांच्या या यशाने इगतपुरी तालुक्याचा मान उंचावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *