
इगतपुरी, प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर, दि.12 ऑक्टोंबर 2026 रोजी,तालुक्यातील जिल्हा प्राथमिक आदर्श शाळा बाहुली खुर्द येथे विद्यार्थ्यांसाठी भव्य शालेय साहित्य वाटप समारंभ उत्साहात पार पडला. सुप्रसिद्ध उद्योजक मा. श्री. अविनाश गोटी, दुर्ग सखा चॅरिटेबल ट्रस्ट (ठाणे) चे श्री. धिमटे सर आणि केंद्रप्रमुख शहापूर यांच्या सौजन्याने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या माध्यमातून शाळेतील गरजू मुलांना उत्तम दर्जाच्या आणि चांगल्या प्रतीच्या वह्या, पेन, कंपास पेट्या, पाऊच, फूटपट्टी आणि अंकलिपी अशा विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक महेश कुमार पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर शैक्षणिक साहित्याचे वाटप श्री. संजय बोरसे (केंद्रप्रमुख), युवराज सूर्यवंशी (मुख्याध्यापक) व श्रीमती कल्पना आहेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना हे हक्काचे साहित्य मिळवून देण्यासाठी अनेक मान्यवरांनी व ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये श्री. प्रशांत देवरे, श्री. योगेश घाडीगावकर, श्री. नंदू गांगुर्डे, श्री. योगेश कांबळे, श्री. कमलाकर नेमाडे, श्री. रुपेश वाघ, श्री. मनोहर वाघ, श्री. पांडुरंग अहिरे, श्री. हवशीराम भगत, श्री. भारत थोरात, श्री. राम भगत, श्री. पंडित, श्री. राजेंद्र ठोंबरे यांनी विशेष प्रयत्न केले. या मदतीबद्दल विद्यार्थी, पालक आणि शाळा प्रशासनाने देणगीदारांचे व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.
