आदिवासी बांधवांचा निफाड येथे धडक ‘जेलभरो’ मोर्चा; विविध प्रलंबित समस्यांवर प्रशासनाचे वेधले लक्ष,

बातमी शेअर करा.

नाशिक: प्रतिनिधी दि. १०/०८/२०२६,रोजी.पिढ्यान्‌पिढ्या प्रलंबित रोजी असलेल्या आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज निफाड येथील जिल्हा रुग्णालयाजवळ सर्व आदिवासी बांधव सकाळी ११ वाजता एकत्र जमले. तेथून या जमावाचे रुपांतर एका भव्य रॅलीमध्ये झाले. रॅली गावाच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबली, जिथे उपस्थितांनी विविध समस्यांचा पाढा वाचत जोरदार घोषणाबाजी केली.”आज आम्ही स्वतः जेलमध्ये जाण्याच्या तयारीने आलो आहोत. पिढ्यान्‌पिढ्या आमच्या समस्या जशाच्या तशाच आहेत आणि कुठल्याही परिणामांना सामोरे जाण्याची आमची पूर्ण तयारी आहे,” अशी ठाम भूमिका घेत आंदोलकांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली.प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचे आश्वासनसदर ‘जेलभरो’ मोर्चादरम्यान निफाडचे पोलीस निरीक्षक (PI) श्री. सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सौ. युतिका पाटील तसेच नायब तहसीलदार श्री. राहुल मुळीक यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी आदिवासी बांधवांच्या सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन देत त्यांच्या सर्व अडचणी समजून घेतल्या.हा मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस गोपनीय शाखेचे श्री. धनंजय जाधव व श्री. अरविंद ढवळे यांचे विशेष सहकार्य लाभले.प्रमुख उपस्थिती व सहभागहा मोर्चा यशस्वी करण्यासाठी खालील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच असंख्य आदिवासी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सामील झाले होते:प्रमुख पदाधिकारी:श्री. रामराव पारधे (सचिव)श्रीमती. ताई वाघ (अध्यक्ष)कार्यकर्ते व पदाधिकारी:श्री. भाऊसाहेब सूर्यवंशी, श्री. वाळीबा ससाणे श्री. रामनाथ गोधडे, श्री. नामदेव माळी, श्री. मंगेश कडाळे, श्री. दावल मोरे, श्री. सोमनाथ बर्डे, श्री. वाल्मीक माळी, श्री. वाल्मिक सूर्यवंशी, श्री. गणपत सूर्यवंशी, श्री. कारभारी गांगुडे, श्री. रंगनाथ कडाळे, श्रीमती. वैशाली सूर्यवंशी, श्रीमती. अनिता बर्डे, श्री. गणपत बिडवे, श्रीमती. गिता चव्हाण, श्री. संतोष गायकवाड, श्री. दिपक पवार, श्रीमती. रंजना माळी, श्री. गोरख पवार, श्री. विनायक पगारे, असे अनेक आंदोलन उपस्थित होते ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *