
=कविता=
दि. 27 फेब्रुवारी 2026, माय मराठी मराठी भाषाआहे;माझी फार गोडजगामध्ये मराठी ;भाषेस नाही तोड. चवी साऱ्या त्यात ;कडवी;तिखट गोडमराठीभाषा कायमची ;राहती हृदयातगाथा तुकोबाची; ओवी जनाईचीतिच्याचरणी माथा ;टेकू सारे जण.हरिपाठ माऊलीचा; भारुड नाथांचेआनंद भरलेला ;जीवनात काठोकाठ.किर्तन ;भजन; देहभान विसरेजगतात माझी ;मराठीच महान.साहित्याचे आहेत; अनेक प्रकारमराठी भाषा जणु !थेंब अमृताचे.नटते शब्दांनी ;थटते अलंकारानिओघळती मोती; जणू ओठांतूनी.आहे अभिमान;माझ्या मराठीला मान मराठी माय माझी; महाराष्ट्राची शान.
प्रा.कृष्णाजी बनसोडे, साकुरी. ता.राहता.जिल्हा.अहिल्यानगर.
