माणिकखांब येथे अंत्यविधी नंतर निर्माण होणारी राख नदीत न टाकता खड्यात टाकुन केले वृक्षारोपण,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी: शिवनाथ घोटकर, इगतपुरी. आगरी समाज चे जेष्ठ नेते आणि माणिकखांब गावचे मा.सरपंच विविध कार्यकारी सोसायटी चे मा.चेअरमेन कै लालु मामा आडोळे, यांचे निधन झाले मृत व्यक्ती ची दहन केल्या नंतर त्यांची रक्षा ( राख) ही नदी च्या पाण्यात विसर्जित न करता आडोळे परिवार ने वृक्षारोपण करून राख त्या झाडाच्या रोपणासाठी खोदलेल्या खड्या मध्ये टाकुन मृत व्यक्तीच्या राखेतून वृक्षसंवर्धन करून वडीलांची आठवण कायमस्वरूपी जपता यावी या उद्देशाने आडोळे परिवार ने घेतलेल्या निर्णयांची व पर्यावरण पुरक व स्तुत्य उपक्रम ची सर्वच समाजातुन कौतुक होत आहे, आडोळे परिवाराने घेतलेल्या निर्णया चा सर्व समाजाने आदर्श घ्यावा आपण बघितले तर नदी प्रदूषित होण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत नदी प्रदूषित होऊ नये म्हणून, आडोळे परिवाराने अंत्यविधी नंतर निर्माण झालेली राख जुन्या परंपरेल अनुसरून व भावनेपोटी मुठभर राख नदीत टाकून उर्वरित राख नदीत न टाकता वृक्षारोपणाच्या खड्यात टाकुन वृक्षारोपण करून वृक्षाच्या रुपाने आपल्या वडिलांची आठवण कायमस्वरूपी जिवित ठेवुन खर तर नश्वर देहाची मुक्ती यातुन साधली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भविष्यात पुढच्या पिढी करीता ह्या वृक्षांच्या माध्यमातून वडीलांच्या आठवणीस उजाळा देत राहील सोबतच आंबा व इतर वृक्षापासुन अनेकांना सावली ये वृक्ष देईल सर्व समाजाने आदर्श घ्यावा असे कार्य आज आडोळे परिवाने समाजाला दिला, यावेळी या वृक्षारोपण च्या वेळी कै.मा.सरपंच लालु मामा आडोळे, यांच्या परिवार चे सर्व सदस्य व गावातील सरपंच व सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *