जि.प.शाळा वाघेरे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:- शिवनाथ घोटकर, इगतपुरी.

दि.१४ एप्रिल२०२६ रोजी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांची १३५ वी जयंती जिल्हा परिषद शाळा वाघेरे ता. इगतपुरी, जिल्हा नाशिक, येथे साजरी करण्यात आली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप व धूप पूजन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांच्या जीवनावर श्रावणी योगेश भोर, आरोही संतोष भोर, अपेक्षा सतीश घोरपडे, प्रेम दौलत चव्हाण, आर्यन राहुल चिकणे, या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. स्वरा मनोहर चिकणे या विद्यार्थीनीने भाषण करून भीम गीत सादर केले. ग्रामपंचायत सदस्य व भारतीय बौद्ध महासभा बौद्धाचार्य प्रभाकर चिकणे, गुरूजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, व त्यांचे कडून पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वही व पेन चे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते दर्शन नामदेव भोर, व वाघ सर यांनी देखील बाबासाहेबांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच २६जुलै २०२६ रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात येईल असे, प्रभाकर चिकणे यांनी सांगितले.यावेळी जि.प. शाळा वाघेरेचे मुख्याध्यापक सौ पाटील मॅडम, वाघ सर, सम्यक चिकणे, धनराज चिकणे, बाबुराव भालेराव, मनोहर चिकणे, अजय चिकणे व कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी घेणारे शिक्षक बिरारी सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत महामानवाला विनम्र अभिवादन करून सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *