
प्रतिनिधी:-शिवनाथ घोटकर,घोटी बु, दौंडत गावातील विशाल शिंदे सैन्यात दाखलइगतपुरी:जिद्द, चिकाटी आणि देशप्रेमाच्या जोरावर तालुक्यातील दौंडत गावातील एका शेतकरी पुत्राने भारतीय सैन्यात (आर्मी) प्रवेश मिळवून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गावातील प्रसिद्ध दिव्यांग शेतकरी कै. कचरू रामा शिंदे, यांचे नातू आणि मारुती कचरू शिंदे, यांचे सुपुत्र विशाल मारुती शिंदे यांची भारतीय सैन्यात निवड झाली असून, आज दुपारी ३ वाजता ते भारतमातेच्या रक्षणासाठी कर्तव्यावर रवाना झाले.परिस्थितीवर मात करत आई-वडिलांनी दिला पाठिंबाविशालचे वडील मारुती शिंदे, हे पायाने दिव्यांग (पोलिओग्रस्त) आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे मोठी शेती असून ते स्वतः एक उत्कृष्ट वेल्डर म्हणून काम करतात. घरात विशाल हा एकुलता एक मुलगा आहे. आजच्या काळात एकुलत्या एका मुलाला आपल्या डोळ्यांसमोर ठेवण्याकडे पालकांचा कल असतो; मात्र मारुती शिंदे आणि आई सौ. कविता मारुती शिंदे यांनी आपल्या अपंगत्वाचा किंवा एकुलत्या एक मुलाचा विचार न करता, त्याला भारतमातेच्या सेवेसाठी सैन्यात पाठवण्याचा ऐतिहासिक व धीरोदात्त निर्णय घेतला. विशाल गेल्या महिन्याभरातच सैन्यात भरती झाला असून त्याचे प्रशिक्षण पूर्ण करून तो देशसेवेसाठी सज्ज झाला आहे.”माझं अपंगत्व किंवा घरची शेती यापेक्षा माझ्या मुलाने देशाची सेवा करावी, हे आमचे स्वप्न होते. आज आमचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.”— मारुती कचरू शिंदे (विशालचे वडील)इगतपुरी तालुका व गावातून कौतुकाचा वर्षावएका दिव्यांग पित्याने आणि माऊलीने आपल्या काळजाच्या तुकड्याला देशसेवेसाठी समर्पित केल्यामुळे संपूर्ण इगतपुरी तालुका आणि दौंडत गावात भावनिक व अभिमानास्पद वातावरण निर्माण झाले आहे. या देशप्रेमी दांपत्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.याप्रसंगी खालील मान्यवरांनी विशाल व त्याच्या पालकांचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या:मा. श्री. निवृत्ती जाधव (शिवसेना जिल्हाप्रमुख)मा. श्री. उदय (जयाभाऊ) जाधव (जिल्हा परिषद सदस्य)मा. श्री. सुनील जाधवमा. श्री. दिलीप जाधवमा. श्री. विष्णू शिंदेमा. श्री. भरत काळेगावकऱ्यांनी विशालला पुढील प्रवासासाठी आणि देशसेवेच्या वाटचालीसाठी मोठ्या उत्साहात निरोप दिला.जय हिंद, जय महाराष्ट्र!
