उंबरकोन येथे जि .प. प्रा. शाळेत 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा झाला,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर घोटी बु. सोमवार दि.26/01/2026,रोजी.उंबरकोन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते श्री. रतन कचरू सारुक्ते यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन, राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीताचे सामूहिक गायन करण्यात आले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात संगीत कवायत, साहित्य कवायत तसेच लेझीम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून प्रभावी भाषणे केली.यावेळी श्री. चंदर कोरडे, श्री. शिवराम मेमाणे व सौ. हेमलता मोरकर यांनी उपस्थितांना तंबाखूमुक्ती, असाक्षरमुक्त गाव व बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा दिली.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नवोदय मित्र मंडळ व ग्रामपंचायत उंबरकोन यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंबरकोन येथील विद्यार्थ्यांसाठी रुपये १०,०००/- किंमतीचा शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका संच भेट स्वरूपात देण्यात आला. तसेच विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमास सरपंच श्री. आत्माराम सारुक्ते, उपसरपंच श्री. संजय सारुक्ते, सर्व ग्रामपंचायत सदस्य, नवोदय मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण सारुक्ते, शालेय व्यवस्थापन समिती (SMC) अध्यक्ष श्री. समाधान जगताप व सर्व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोक जगताप, श्री. रतन सारुक्ते, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. भोसले सर यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्याध्यापक श्री. राजेंद्र मोरकर यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करत शाळेची प्रगती व भविष्यातील वाटचाल याविषयी माहिती दिली. तसेच ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. मान्यवर सरपंच, उपसरपंच व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणांतून शाळेच्या कार्यपद्धतीबाबत व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वाळीबा पिचड यांनी केले तर श्री. पंढरीनाथ गोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *