
प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर,आंबोली गावा जवळील काजवा हिल्स या विल्यामध्ये रविवार दिनांक 25.01.2026, रोजी पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य बैठकीच्या वेळेस महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री.राम खुर्दळ, आणि ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक मा.श्री.देवचंद महाले, यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ,दिंडोरी, त्र्यंबकेश्वर,इगतपुरी, तालुक्यातील पत्रकाररांची पत्रकार संरक्षण समितीचे नाशिक जिल्हा, (नाशिक विभाग) पदाची निवडपत्र आणि जबाबदारी दिली यावेळी आंतरराष्ट्रीय न्यूजच्या जिल्हा प्रतिनिधी आता कष्ट व इच्छा शक्तीच्या जोरावर कुर्तीशील कार्य करणाऱ्या व्हिडिओ इम्पॅक्ट स्टोरी दुर्गम भागातील त्यांचे महिलांना सक्षम करण्याची धडपड करणाऱ्या मायाताई, यांच्या उपस्थितीत व त्यांना पत्रकार संरक्षण समितीच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख (नाशिक विभाग) पदाचे निवड पत्र दिले. व जबाबदारी दिली, आणि त्यांनी नाशिक, जळगाव, धुळे, मालेगाव, नंदुरबार, येथील सक्रिय पत्रकार जोडण्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या, अरुण भाऊ शिंदे, यासारखे अनुभवी जेष्ठ पत्रकारांना नाशिक जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पत्रकार संरक्षण समितीला जोड ण्यात आले अतिशय सक्रिय पत्रकार प्रतिकूल स्थितीत पत्रकारिता करणारे पांडुरंग दोंदे देवगाव यांचे त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख निवड झाली. इगतपुरी तालुका अध्यक्ष म्हणून सुनील धर्माजी पगारे , लोकराज्य प्राईम न्यूज मुख्य संपादक, यांची निवड करण्यात आली व इगतपुरी तालुक्यातील नव्या दमाचे पत्रकार शिवनाथ भाऊ घोटकर, यांची इगतपुरी तालुका सचिव, म्हणून निवड करण्यात आली देव डोंगरा येथील दुर्गम भागात परखंड वास्तविक पत्रकारिता करणारे शंकर भाऊ निंबोरे यांचेही आभार मानण्यात आले एकूण सर्वांचे ओळख चर्चा व संवाद, चविष्ट जेवण करत, देवचंद भाऊ, यांनी वातावरणाचा आनंद घेत सर्वांचे आभार मानून आणि स्वागत करून बैठक या ठिकाणी संपली असं जाहीर केले,
