श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, माणिकखांब येथे आषाढी एकादशी सोहळा उत्साहात संपन्न; आमदार हिरामण दादा खोसकर यांच्या हस्ते महाआरती,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर, घोटी बु. माणिकखांब,दि.२५/०७/२०२६ रोजी, इगतपुरी तालुक्यातील ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणिकखांब येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. इगतपुरी–त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण दादा खोसकर, यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची विधिवत पूजा आणि महाआरती संपन्न झाली.विशेष सत्कार: चव्हाण बंधू पाटील, परिवाराच्या वतीने आमदार हिरामण दादा खोसकर, यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.बळीराजासाठी प्रार्थना: आमदार खोसकर यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व समाजाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करताना “इडा-पिडा जाऊ दे, बळीचे राज्य येऊ दे आणि बळीराजा सुखी राहू दे,” अशी भावना व्यक्त केली.फराळ प्रसाद वाटप: महाआरतीनंतर उपस्थित हजारो भाविकांना खिचडी, लाडू, चिवडा, वेफर्स व केळी या फराळ प्रसादाचे वाटप करण्यात आले.मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थितीमुंबई–आग्रा महामार्गालगत दारणा नदीच्या रमणीय तीरावर वसलेल्या या मंदिरात आयोजित सोहळ्यास माणिकखांब परिसरासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. चव्हाण बंधू, पाटील परिवार आणि माणिकखांब ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी ॲड. एन. पी. चव्हाण, ॲड. जी. पी. चव्हाण, ॲड. दिलीपजी वनारसे, हभप लक्ष्मण बाबा चव्हाण, हभप बन्सी बाबा चव्हाण, माजी सरपंच हरीश चव्हाण, दीपक चव्हाण, संदीप चव्हाण, विजय चव्हाण, मदन कडू, विनायक काळे, विनायक आडोळे, वासुदेव चव्हाण, खंडू चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते. या सोहळ्यामुळे माणिकखांब येथे भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *