
प्रतिनिधी: शिवनाथ घोटकर, घोटी. आज दि.26/01/2026,रोजी. घोटी बु. रामराव नगर येथील जिल्हा परिषद शाळे, मध्ये प्रजासत्ताक दिना निमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक, शाळेचे अनेक शिक्षक, आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते, आगरी सेना परिषद विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष समाधान भाऊ भागडे, यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, यावेळी इयत्ता पहिली ते सातवी च्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाल श्रीफळ व ट्राफी देऊन आगरी विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष समाधान भाऊ भागडे, यांच्या हस्ते करण्यात आला आणि आदर्श शिक्षक व शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आला, यावेळी समाधान भाऊ भागडे. यांनी आपल्या मनोगतातून आपल्या अविरत ज्ञानसाधनेने आपण आपल्या शाळेत इतरांना प्रेरणा मिळेल असे वर्षभरात दिपस्तंभसारखे अध्ययन केले आहे. आपण अध्ययनाबरोबरच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अष्टपैलू गुणांची चमक दाखवून शाळेचे आणि गावचे नाव उज्वल केले आहे. त्याबद्दल आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. आपल्यातील जिद्द, अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करून आदर्श विद्यार्थी सन्मान चिन्ह देताना आम्हाला आनंद होत आहे. आशा भावना व्यक्त केले शाळेच्या वतीने आगरी सेना विद्यार्थी परिषदेचे तालुका अध्यक्ष समाधान भाऊ भागडे, यांचे आभार मानण्यात आले.
