वृक्ष लावा, वृक्ष जगवा!

बातमी शेअर करा.

🔷कविता🔷 धरतीवरती हिरवे स्वप्न फुलवूया, झाडे लावून निसर्गाचे ऋण फेडूया.|| १ || प्रत्येक रोपटे आहे जीवनाचा श्वास, झाडांमुळेच उजळतो जगाचा प्रकाश.|| २ || पाऊस, हवा अन् शीतल सावलीची शान, वृक्षच आहेत या पृथ्वीचे खरे प्राण.|| ३ || समृद्ध वनराईचे मिळून करूया जतन, हाच निसर्गरक्षणाचा अपुला व्रतधर्म.|| ४ || चला, आज एक झाड आपण नक्की लावू, सुंदर, हिरवेगार उज्ज्वल भविष्य घडवू.|| ५ || बनसोडे सरांचा संदेश हाच महान, “वृक्ष लावा, वृक्ष जगवा” – हेच अपुले अभियान! || ६ ||

शब्दांकन व संकलन:कवी: श्री ज्ञानेश्वर कृष्णजी बनसोडे,(सर) पत्ता: साकुरी,ता.राहता,जिल्हा.अहिल्यानगर,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *