20 मार्च चवदार तळे सत्याग्रह क्रांती दिन,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधीः- प्रा.ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे जि. अहिल्या नगर
दि. 20/03/2026, महाडच्या चवदार तळ्याचे जनक महामानव
डॉक्टर बाबासाहेबआंबेडकर
तहानलेल्या पाखरावर तू कसे उपकार केलेस;
एकच ओंजळ प्यालास पण सारे तळे चवदार केले,
.. अस्पृश्य समाजातील अस्मिता जागविणारा पहीला महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार प्रख्यात कायदे पंडित अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला विद्वान अशी अनेक बिरुदावली लाभलेल्या या युग प्रवर्तकाने हिंदू समाजातील जातिभेद नष्ट व्हावा ;समता प्रस्थापित व्हावी म्हणून अहोरात्र जिवापाड कष्ट करून समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी जिवाचे रान केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत उत्तम अशी राज्यघटना देशाला दिली आहे.
हजारो वर्ष अपमानित स्थितीत पडलेल्या दलित बांधवांचा स्वाभिमान जागा केला.
त्याच प्रमाणे वर्षानूवर्ष गुलामगिरीत खितपत पडलेल्या या आपल्या अस्पृश्य समाजाला त्यांनी अहोरात्र झगडून प्रसंगी अनेकांचा विरोध पत्करून माणसाची माणुसकी मिळवून दिली. आणि संपूर्ण भारतीय समाजामध्ये समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला .समाजामध्ये जी काही विषमता निर्माण झालेली आहे. त्या विषमतेचा समूळ पणे नायनाट झाला पाहिजे .अशा प्रकारची जिद्द डॉक्टर बाबासाहेबांनी अंगी बाळगली होती. त्यांच्या या जिद्दीला त्यांनी केलेल्या अहोरात्र कष्टामुळे यश आले.त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी –
नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश करणे निसिद्ध मानले जात होते. म्हणून समाजाला काळाराम मंदिर प्रवेश मिळवून देण्याचे महान अशा प्रकारचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे.आंबेडकरांच्या मते हिंदुत्व हे जितकी स्पृशाची मालमत्ता आहे तितकीच ती अस्पृश्यांची आहे.म्हणून मंदिर प्रवेशाचा हक्क हा मान्य आहे. या भावनेतून त्यांनी अस्पृश्य समाजाला शेवटी काळाराम मंदिर प्रवेश मिळवून दिलाच ही अतिशय अभिमानाची व कौतुकास्पद अशा प्रकारची गोष्ट आहे.
त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह केला. आणि त्या दिवसापासून अनेक वर्षी हा दिवस °समता दिन म्हणून तसेच सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत समतेसाठी अनेक आंदोलने झाली. भारतीय राज्यघटनेने या देशातल्या सर्व जाती धर्मांना समान हक्क प्रदान केला. पाण्याच्या प्रश्नावरून जाती आणि धार्मिक अस्मिता कशा उफाळून येतात याची उदाहरणे आपण आजही समाजात पाहत आहोत. तथाकथित सवर्ण; उच्चधर्मीय; उच्च जातीय लोकांकडून केला जाणारा दुजाभाव; द्वेष; अत्याचार अजूनही समाजात पाहावयास मिळत आहेत. अस्पृश्य समाजाला अतिशय वाईट अशा प्रकारची वागणूक मिळत होती. सर्व बाबतीमध्ये अस्पृश्य समाजाला बंधन पाळावी लागत होती. संपूर्ण भारतीय अस्पृश्य समाज हा गरीबीने ग्रासलेला असल्यामुळे आणि अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यामुळे त्या काळामध्ये आपल्यावर अन्याय होत आहे याची पुसटशी कल्पना अस्पृश्य समाजाला होत नव्हती. ती जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून अस्पृश्य समाजाला करून दिली.
चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना उद्देशून म्हटलं होतं; की,चवदार तळ्याचे पाणी पिल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही. परंतु इतरांप्रमाणे आम्हीही माणसेच आहोत; हे सिद्ध करण्याकरिता त्या तळ्यावर आपल्याला जावयाचे आहे. भारतातील शोषण केलेल्या तसेच यावेळी सवर्णांकडून अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या दलित जातींना सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेवर समान हक्क देणारा कायदा 1923 साली मुंबई कायदेमंडळाने संमत केला. आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाड नगरपालिकेच्या पुढाकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा आयोजित करण्यात आली. आणि त्या सभेमध्ये अस्पृश्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले ;की जेणेकरून अस्पृश्य समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. सर्वांना समान अशा प्रकारची वागणूक मिळेल. या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
आणि शेवटी मोठ्या अथक परिश्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 साली महाडच्या चवदार तळ्याचा हा ऐतिहासिक सत्याग्रह केला आणि ते चवदार तळे संपूर्ण अस्पृश्य समाजासाठी पाणी पिण्यासाठी खुले करून दिले. आणि बाबासाहेबांनी त्यावेळेला या तळ्यातले पाणी पिणे हा आपला अधिकार आहे. भारतीय समाजाला सिद्ध करून दाखवले.
म्हणून या महामानवा विषयी मला असे म्हणावेसे वाटते की.
दलितांची तलवार होऊनगेले. अन्यायाविरुद्धप्रहार होऊनगेले.
होते ते एक गरीबच.
पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले.
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
भारताचे संविधान लिहून गेले
अशा या थोर महामानवास मी त्रिवार अभिवादन करतो.
माझ्या सर्व बंधू भगिनींना माझा प्रेमपूर्वक जयभीम,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *