त्र्यंबकेश्वर येथे संत चोखा महाराज मंदिरा च्या जागेत अतिक्रमण जिल्हाधिकाऱ्यांना भिम शक्ती सेने च्या वतीने निवेदन,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर,इगतपुरी. दि.१८/०३/२०२६, देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर नगरी येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर हे वारकरी संप्रदायाती महान संत योगी आणि संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू गुरु, निवृत्तीनाथांची समाधी दिवस जेष्ठमध्ये असतो. निवृत्तीनाथांची यात्रा पौष वद्य मध्ये भरते.तसेच उटीची वारी ही चैत्र वद्य एकादशीला होते.श्रावण सोमवार व महाशिवरात्र या दिवशी ज्योतिर्लिंग दर्शनास गर्दी होते . तसेच बाराही महिने देशातून राज्यातून अनेक संत, महंत, वारकरी, भक्तगन, त्र्यंबकेश्वर नगरीला दर्शनासाठी येतात, कुंभमेळ्याच एक स्थान म्हणून पण त्र्यंबकेश्वरला ओळख आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक विकासाची कामे चालू आहेत पण दुर्दैव म्हणजे,संत चोखा महाराज समाधी व मंदीर आहे . च्या जागेत अनेक वर्षापासून अतिक्रमण झाले आहे, निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदीरा समोर त्यांचे भक्त संत चोखा महाराज समाधी व मंदीर आहे . चोखा महाराज वहिवाटदार ट्रस्टीच्या मालकीची जागा असून त्या जागेवर मोठ्या प्रमाणात काही लोकांनी घरे बांधुन अतिक्रमण केले आहे. संत चोखा महाराज भक्तांची फार मोठी गैरसोय व असुविधा होत असून प्रत्येक एकादशीला व इतर वेळेत /वारीला भक्तगण या ठिकाणी येत असून संत चोखा महाराज यांचे दर्शन घेतात. शासनाने संबंधीत त्रंबकेश्वर नगरपरिषदेन कोणतेही विषयांकित मुलभुत सुविधा केली नसुन व झालेले अतिक्रमण काढले नाही, सांप्रदायातील भक्तगणांना ऊन, वारा, पाऊस उघडयावर चोखा महाराज मंदीरसमोर मुक्काम करावा लागत असून या सर्व भक्तगणांची फार मोठी गैरसोय होत आहे, हे टाळण्यासाठी अतिक्रमण काढयासाठी व मुलभुत सुविधा निर्माण करण्यासाठी दि.०३/१०/२०२५ रोजी मा. मुख्याधिकारी साहेब त्रंबकेश्वर यांना अर्ज देऊनही आजपर्यंत संविधानिक मार्गाने व शासनाच्या सेवानियम कायदयाचे पालन करून आजपर्यंत कोणतीही कार्रवाही केली नाही.मा. साहेबांना सहया करणारे भक्तगण विनंती करत , तात्काळ सिंहस्थ कुंभमेळयाच्या पर्वणीमध्ये/आणि कार्यक्रमामध्ये निधी मंजुर करून संत चोखा महाराज मालकीच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढुन भक्तगणांची शेकडो वर्षापासुन होत असलेली गैरसोय दुर करावी यांच्यासोबत मुलभुत सुविधा निमार्ण करण्यात यावी आराखडा तयार करण्याची बैठक घेण्याची आदेश करून सिंहस्थ पर्वणीच्या /कार्यक्रमाच्या निधीमधुन देशभरातुन येणाऱ्या भक्तगणांची टॉयलेट, बाथरूम, पिण्याचे पाणी, पार्किंग व्यवस्था, राहण्याची, सुविधा निर्माण करण्यात यावी याबद्दल निवेदन देण्यात आले, यावेळी उपस्थित, गौतम नारायण पगारे, भिम शक्ती सेना ईगतपुरी तालुका अध्यक्ष. बाळासाहेब सोनवणे आर.पी.आय .ईगतपुरी तालुका युवा अध्यक्ष. ह.भ.प .काळु अर्जुन गागुर्डे, ह.भ.प . नानासाहेब कारभारी सोनकांबळे, ह.भ.प.दादु भाऊराव साळवे, ह.ब.प. भाऊराव सावळीराम डोळस, ह.भ.प .रघुनाथ विठ्ठल गांगुर्डे, ह.भ.प.सुरेश कृष्णा दोंदे,इ.उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *