इगतपुरी तालुका खरेदी-विक्री संघाच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांतशेठ कडू, व खंडेराव धांडे, यांची निवड.

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर,घोटी बु.
शनिवार दि.14/03/2026,रोजी, इगतपुरी तालुका खरेदी-विक्री संघाच्या स्वीकृत सदस्यपदी मा.श्री.प्रशांतशेठ कडू आणि मा.श्री.खंडेराव धांडे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तालुक्यातील सर्व पक्षीय राजकारणी, समाजकारणी आणि मान्यवरांनी एकत्र येत सर्वसंमतीने हा निर्णय घेतला.

या निवडीमुळे संघाच्या कामकाजाला अधिक बळ मिळणार असून शेतकरी, व्यापारी व सभासदांच्या हितासाठी अधिक प्रभावी काम होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी मा.श्री.संदीपजी गुळवे, मा.श्री.ज्ञानेश्वर दादा लहाणे, चेअरमन मा.श्री.बाळासाहेब गव्हाणे, तसेच सरपंच मा.श्री.अनिलजी भोपे, मा.श्री.रघुनाथ नाना तोकडे, तसेच तालुक्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी यांनी आपली मते व्यक्त केली. त्यांनी नवनियुक्त सदस्यांना शुभेच्छा देत संघाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला इगतपुरी तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, समाजसेवक व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनियुक्त सदस्य प्रशांतशेठ कडू, आणि खंडेराव धांडे,यांनी दिलेल्या जबाबदारीबद्दल सर्वांचे आभार मानले व खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शेतकरी व सभासदांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *