संत नामदेव महाराज व संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त घोटी बुद्रुक येथे भजन आणि महा आरती आयोजन,

बातमी शेअर करा.

घोटी बुद्रुक (प्रतिनिधी):शिवनाथ घोटकर, दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी घोटी बुद्रुक येथील मारुती मंदिरात संतश्रेष्ठ नामदेव महाराज आणि संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र सोहळ्यात भजनाची सांगता आणि महाप्रसाद मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.भजन सेवेने वातावरण भक्तिमयया आध्यात्मिक कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भक्तिमय वातावरणात झाली.

यावेळी नामांकित वारकऱ्यांच्या भजनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये ह.भ.प. सुनील जाधव, ह.भ.प.निवृत्ती जाधव, ह.भ.प.प्रभाकर जाधव, ह.भ.प.भागडे, ह.भ.प. पंढरीनाथ महाराज भोर, ह.भ.प.पांडू मामा लोहार, ह.भ.प. तुकाराम जगताप, ह.भ.प.योगेश भोर, ह.भ.प.बाळासाहेब माळवे आणि ह.भ.प.निवृत्ती खत्री यांनी सुरेल भजनांचे गायन केले. या सर्वांच्या सहकार्याने आणि उपस्थितीमुळे कार्यक्रम अत्यंत सरोद व प्रभावी झाला.

महाप्रसादाचा लाभकार्यक्रमाच्या उत्तरार्धात विधिवत आरती करून भजनाची सांगता करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे मोठे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला.ग्रामस्थांचा व समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभागसमस्त संत नामदेव महाराज शिंपी समाज, घोटी बुद्रुक, संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त संपूर्ण शिंपी समाज तसेच घोटी गावातील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते. सर्वांच्या सढळ हाताने व सहकार्याने हा पुण्यतिथी सोहळा अत्यंत यशस्वीपणे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *