घोटी बु. येथे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे, बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन देण्यात आले.

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी: शिवनाथ घोटकर,घोटी बु. ११/०३/२०२६रोजी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ११ मार्च रोजी बलिदान दिन (पुण्यतिथी) संपुर्ण महाराष्ट्रात पाळला जातो, जो त्यांच्या स्वराज्यनिष्ठा धर्मनिष्ठा आणि सर्वोच्च बलिदानाचा स्मरण करतो। छत्रपती संभाजी महाराज (१४ मे १६५७ – ११ मार्च १६८९) हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती आणि शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र होते. अवघ्या ९ वर्षांच्या कार्यकाळात १२० हून अधिक युद्धे लढून त्यांनी मोगल, सिद्धी, पोर्तुगीज यांसारख्या शत्रूंना सळो की पळो करून सोडले. आपल्या पराक्रमी, स्वाभिमानी वृत्तीमुळे त्यांना ‘छावा’ म्हटले जाते, तर धर्मवीर म्हणूनही ते ओळखले जातात, स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या या महापराक्रमी राजाला (घोटी बु. मारुती मंदिर ) येथे भाविकांनी अभिवादन केले, सध्या राज्यात १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ हा काळ ‘बलिदान मास’ म्हणून पाळला जात आहे दिवस संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि त्यागाची आठवण करून देणारा एक प्रेरणादायी दिवस आहे, यावेळी उपस्थित, श्री.नाथ भाऊ भोर, मायाताई भोर, सोनाली ताई भोर, श्री.आकाश भाऊ भोर, श्री.पप्पू भाऊ म्हसणे, श्री ललित भाऊ कडू, भारतीताई छत्रे, रोशनी ताई छत्रे, अनेक ग्रामस्थ उपस्थित होते, “जय जिजाऊ” ” जय शिवराय” “जय शंभुराजे” “जय महाराष्ट्र” अशी गर्जना देत राजांना विनम्र अभिवादन देऊन कार्यक्रम इथेच संपला अस जाहीर करण्यात आले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *